रवी जाधव दिग्दर्शित न्यूड या चित्रपटाला सेन्सॉरकडून प्रमाणित करण्यात आले असून कोणत्याही भागाला कात्री न लावता सेन्सॉरने ‘अ’ प्रमाणपत्र पारित केले.
नुकताच गोव्यात झालेल्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून (IFFI) न्यूड चित्रपट वगळण्यात आल्याने मोठा वाद झाला होता. रवी जाधव यांनी आवड उठवल्यावर मराठी सिनेसृष्टीने याविरोधात आवाज उठवला होता. महोत्सवात दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटांच्या अंतिम यादीतून ‘न्यूड’ हा चित्रपट वगळण्याचा निर्णय केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने घेतला होता. चित्रपट प्रमाणित केला नसल्याने चित्रपटाला वगळण्यात आल्याचे माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले होते. रवी जाधव यांनी या निर्णयाला विरोध करत आवाज उठवला होता. परंतु शेवटी वाद मिटवत रवी जाधव नी पुढच्या चित्रपटाच्या तयारी लागण्याचा निर्णय घेतला होता.
अधिक माहितीसाठी:
वादावर पडदा टाकत रवी जाधव पुढच्या चित्रपटाच्या तयारीसाठी रुजू…
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.