Real Story of Mowgli, खऱ्या आयुष्यातील मोगली

0
Real Story of Mowgli, खऱ्या आयुष्यातील मोगली

९० च्या दशकात वाढलेल्यांपैकी जर तुम्ही एक असाल तर ‘द जंगल बुक’ नक्कीच तुमच्या सर्वात सुंदर आठवणींपैकी एक असेल. आपल्यापैकी बहुतेक जणांसाठी जंगल बुकचा अर्थ फक्त मोगली (Mowgli) होय. मोगली (Mowgli) ला आपण अॅनिमेशन चित्रपट आणि पुस्तकांमधून नेहमीच ओळखत आलो आहोत. पण मोगलीचे वास्तविक जीवन कसे होते हे तुम्हाला ठाऊक आहे का?
Netflix Mowgli Story

Real story of Mowgli

१८७२ मध्ये जेव्हा शिकाऱ्यांचा एक गट उत्तर प्रदेशच्या जंगलातून फिरत होता तेव्हा त्यांना काहीतरी असामान्य दिसले. जंगलातून चालत लांडग्यांची एक टोळी मानव सारख्या आकाराच्या मागे पळत जाताना दिसत होते.ते टोळके जवळच्या गुहेत गळून गेले, तेव्हा शिकार करणाऱ्यांनी गुहेच्या प्रवेशद्वारावर आग लावली. धुराच्या लोटांमुळे लांडगे बाहेर आले तेव्हा शिकारींनी त्यांना ठार मारले आणि त्यांच्यातील मुलाला पकडले. त्या मुलाचे नाव डीना असे होते.

Real Life Mowgli kid
शिकारींनी त्या मुलाला मिशनरींनी चालवलेल्या अनाथाश्रमात आणले. जेथे त्याला सनीचर असे नाव देण्यात आले. सनीचर म्हणजे उर्दू भाषेत शनिवार आहे.

सुरुवातीला डीना मनुष्य गोष्टींची कल्पना करू शकत नव्हता, परंतु अनाथाश्रम स्वामी फादर एरहर्ट यांच्या मते तो हळूहळू मानवीय चालरिती समजू लागला.

Real Story of Mowgli Marathi
सामान्य मुले त्यांच्या आयुष्याच्या पहिल्या दोन वर्षांमध्ये बोलणे शिकत असतात, परंतु डीना म्हणजेच सनीचर ला बोलायला आणि लिहायला अनेक अडचणी येत होत्या. इतरांशी संवाद साधण्यासाठी तो विचित्र प्राण्यांचे आवाज काढत असे.

तो मनुष्य आयुष्याची पद्धत समजून सांगण्यात आश्रम जवळजवळ अयशस्वी होत होते. सुरुवातीला त्याने कपडे घालण्यास नकार दिला आणि तो सुरुवातीच्या दोन दशकांदरम्यान पॅन्ट आणि शर्ट परिधान करण्यास सुद्धा शिकू शकला नाही.
तो शिजवलेले अन्नही खाऊ शकत नव्हता. तो कच्चे मांस खायचा. कारण त्याने आपले बालपण मांसाहारी लांडग्यांमध्ये काढले होते. काचे मांस चावण्यासाठी तो आपले दात टोकदार बनवत असे.
Mowgli real story
त्याने अनाथाश्रमात घालवलेल्या वर्षांत मनुष्य राहाणीमान शिकायला खरोखरच संघर्ष केला. त अनाथाश्रमात दुसर्या एका दुर्गम मुलाबरोबर चांगला मित्र झाला होता. अनाथाश्रमाच्या फादर एरहर्ट यांनी त्यांच्या मैत्रीविषयी असे म्हटले:

“या दोन मुलांना एकत्र सहानुभूतीच्या एका विचित्र बंधनाने जोडले आहे.”
Mowgli Real life story
डीना ला मनुष्यीय चालीरीती समजून घ्यायला वेळ लागत होता. त्याला मनुष्य सवयीमधील फक्त धूम्रपान हीच सवय आवडली होती. त्याला धूम्रपान चे व्यसन लागले होते.
मनुष्यांशी एक दशकांच्या सहकार्यानंतरही त्याची शारीरिक आणि मानसिक वाढ होऊ शकली नाही. त्याचे दात आकाराने सामान्य दातांपेक्षा मोठ्या आकाराचे होते.
अशा या डीना म्हणजेच मोगली चा मृत्यू १८९५ साली झाला.
अशा या मोगली चे आयुष्य केवळ 30 वर्षाच्या आतच संपले. Netflix ने मोगली चा नवीन चित्रपट आपल्या भेटीस घेऊन आले आहेत. आपणास खऱ्या आयुष्यातील मोगली कसा वाटला आम्हाला नक्की कळवा.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

Naal Movie Leaked Online, Piracy कॉपी इंटरनेट वर उपलब्ध

Kaagar: सैराट फेम रिंकु राजगुरूचा ‘कागर’ चित्रपटाची उत्सुकता शिगेला, पोस्टर प्रदर्शित

देशाचे पहिले नागरिक राष्ट्रपती, तुमचा नंबर किती?

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.