महाराष्ट्र कोरोना: केंद्राकडून रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन जिल्ह्यांची यादी जाहीर

0
महाराष्ट्र कोरोना: केंद्राकडून रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन जिल्ह्यांची यादी जाहीर

महाराष्ट्र कोरोना: केंद्र सरकारने ग्रीन झोन आणि ऑरेंज झोन घोषित केले आहेत. राज्याला ३ मे ला लॉकडाऊन लागू करून ४० दिवस पूर्ण होत आले आहेत. लॉकडाउन सूरु असताना सुद्धा कोरोना व्हायरस बाधितांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.

लॉकडाऊन शिथिल केला तर संसर्ग वाढेल आणि लॉकडाउन सुरू ठेवला तर आर्थिक संकट. या पेचातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने देशभरातील जिल्ह्यांचे रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन मध्ये वर्गीकरण केलेले आहे. या वर्गीकरणाची यादी देखील केंद्र सरकारकडून आज जाहीर करण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भारतातील 733 जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागले आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू, पुणे आणि अहमदाबाद या सर्व शहरांची 3 मे नंतरही ‘नो अ‍ॅक्टिव्हिटी झोन’ अशी विभागणी दिली आहे.
जारी केलेल्या यादीनुसार 130 रेड झोन तयार करण्यात आले आहेत, जेथे 3 मे नंतर कठोर निर्बंध लादले जातील. तथापि, ऑरेंज झोनमध्ये अंशतः सुलभता आणि ग्रीन झोनमध्ये भरीव सुलभता देण्यात येईल.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आज जनतेशी संवाद साधताना रेड झोन, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोन बाबत माहिती दिली. ३ मेनंतर राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि औरंगाबादसह इतर रेड झोन वगळता इतर झोनमध्ये परिस्थिती पाहून आतापेक्षा अधिक मोकळीक दिली जाईल. मात्र घाई-गडबड करू नका, अन्यथा सर्व तपश्चर्या वाया जाईल असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.

केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील १४ जिल्हे रेड झोन, १६ जिल्हे ऑरेंज झोन, तर ६ जिल्हे ग्रीन झोन घोषित केले आहेत. या क्षेत्रात लॉकडाऊन संदर्भातील नियमावली येत्या ३ मे रोजी घोषित केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्र रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन

रेड झोन- मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव

ऑरेंज झोन- रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलडाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा, बीड

ग्रीन झोन- उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, वर्धा, गोंदिया, गडचिरोली

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.