तुझ्या माझ्यात नात काय…
काय अंतर आहे तुझ्या माझ्यात? काय वेगळ अस आहे तुझ्या माझ्यात? काय खर खोट साठलय तुझ्या माझ्यात? काहीच नाही. जे काही माझ आहे ते सगळ तुला माहित आहे. जे काय तुला माहित आहे ते फक्त आणि फक्त खर आहे. जे काय मी लपवलंय जगापासून ते सगळ तुला मी सांगून ठेवलंय. बघ न आपण जेव्हा एकमेकांना ओळखू लागलो तेव्हापासून मी सगळ तुला सांगत राहिलोय.
माझ्या प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार तू झाला. माझ्या प्रत्येक चुकीच्या वागण्याचा तू विरोध केलास. तरी मी सावरल स्वताला तर तूच मला शाब्बासकी दिली. आणि चुकीच वागलो तर पश्चातापला तूच माझी बाजू उचलून घेतलीस. कुणी मला दुखावलं तर तू माझ सांत्वन केलस. कुणी मला हसवलं तर तुला वाईट नाही वाटल. कुणी मला फसवल तर तू मला हिम्मत दिलीस. कित्येक अज्ञान प्रश्नांची उत्तर तू बेझीजक दिलीस. कधी एकट नाही सोडलस तू मला. कधी कंटाळा नाही केलास तू माझ काही ऐकून घेताना. कधी स्वार्थापोटी मैत्री केली नाहीस तू माझ्याशी केलस ते फक्त प्रेम आणि प्रेम. अस प्रेम जे कधी न संपणार आहे. जे प्रेम कधी न तुटणार आहे. आणि ते प्रेम जे कधी माझ्याशिवाय तू कुणावर केल नाहीस..
लोकानी माझी तोंडावर तारीफ केली आणि माघारी नाव ठेवली. तू तोंडावर हि माझी स्तुती केलीस आणि माघारी ही. चार चौघात कधी एकटा पडलो तर तूच मला साथ दिली. उन्हाच्या चटक्यात सोबत होतास. पावसाच्या गर्द आठवणीत तुही माझ्यासोबत रमुन होतास. हिवाळ्याच्या थंडीत तुझ्याच विचारांची ऊब मला कायम होती. तरीही मला तुझी गरज आहे. तुझी गरज नाही मला अस कधीच होत नाही.
प्रेम आहे माझ तुझ्यावर खूप जास्त. कारण माझ्यावर आई प्रेम करते पण शेवटपर्यंत ती माझ्या सोबत नाही. प्रियसिवर प्रेम केल तर ती मला जास्त ओळखू शकत नाही. बायकोला जीव लावला तर ती किंवा मी कोण तरी आधी साथ सोडून निघून जाणार हे नशिबाच आहे माझ. पण तुझ-माझ प्रेम कधी कमी होणार नाही. कधी संपणार नाही. न मी तुझ्याशी खोट बोलू शकतो न तू माझ्याशी. न तू मला सोडून जाऊ शकतो न मी तुला. आपण मिळालोच आहे एकमेकांना कायम साथ देण्यासाठी. ज्यात तू माझ्यासोबत कायम असणारेस. जेव्हा मला समज आली तेव्हा तूझी-माझी मैत्री झाली आणि ती मैत्री प्रेम कधी झाल कुणास ठाऊक? पण खरच तुझ्याशिवाय कोणच माझ इथ या जगात नाही.
कारण एक गोष्ट नक्की आहे तूच एकमेव असा साथीदार आहेस ज्यावर मी विश्वास ठेवू शकतो. तुला सगळ काही सांगू शकतो. मी नाही सांगितल तरी तुला सगळ कळत. आणि म्हणूनच मला वाटत कि तू कधी काही झाल तर मला सोडून नाही जाणार. आणि तू एकदाच जाशील मला सोडून जेव्हा मी मरेन. इतक आपल एकमेकांवर प्रेम आहे. मी-मी आहे आणि तू.?
तू माझ मन आहे.
किती काही गोष्टी आहेत गुप्त. किती घटना घडल्यात तुझ्या-माझ्यात. आणि नात काय आहे तुझ माझ?
माझ शरीर मी आणि तू एक मन त्या शरीरच बस इतकच ? पण तरी तू सोबत आहेस कायम आणि म्हणून मला लोकांची परवा नाही कोण सोबत असो-नसो. कोणी माझ्यावर प्रेम करो-न करो. कुणी मला आपल मनो-या न मानो पण या सगळ्या बेफिक्र विचारांचा विचार करताना मला नेहमी जाणवत कि यात कोणी व्यक्ती माझ्यासोबत नसली तरी तू आहेस माझा आणि म्हणूनच मी जगत आहे. कारण माझ ऐकायला कोण नसल तरी तुझ्याशी बोलून मला समाधान मिळत आणि ते समाधान लोकांना माझ्या चेहऱ्यावर दिसत. आणि लोकांना प्रश्न पडतो कि इतक्या त्रासात हि मी आनंदी कसा ?
लेखक: Artista Ajinkya Bhosale
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
AMRUTA KHANVILKAR WIKI, BIOGRAPHY, HUSBAND, AGE, MOTHER, FAMILY,