Richard Kettleborough भारतासाठी अपशकुनी, भारत-न्युझीलंड सामन्याचे पंच

0
Richard Kettleborough भारतासाठी अपशकुनी, भारत-न्युझीलंड सामन्याचे पंच

T20 विश्वचषक मध्ये रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना रंगणार असून एक बातमी वाचून समर्थक थोडे निराश होणार आहेत. पाकिस्तान सोबत विश्वचषक मध्ये पहिल्यांदा हरल्यानंतर भारताला न्यूझीलंड सोबत जिंकणे महत्वाचे आहे. परंतु टीम इंडिया साठी सामन्याचे पंच अपशकुनी सिद्ध होऊ शकतात.

Richard Kettleborough हे या सामन्याचे पंच असून ते जेव्हा जेव्हा भारताच्या सामन्यात पंच राहिले आहेत तेव्हा तेव्हा भारताची कामगिरी खराब राहिलेली आहे. २०१४ नंतर रिचर्ड केटलब्रो हे पंच राहिलेल्या ICC स्पर्धेत भारताची कामगिरी खूप खराब आहे. यातील सर्व सामने भारताने गमावले आहेत.

Richard Kettleborough Umpire Record in India Match

  • 2014 च्या T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत श्रीलंकेविरुद्ध पराभव
  • 2015 मधील विश्वचषक उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव
  • 2016 च्या T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजकडून पराभव
  • 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताला पाकिस्तानकडून पराभव
  • 2019 च्या वर्ल्ड कपच्या सेमीफायनल मॅचमध्ये टीम इंडिया न्यूझीलंडकडून पराभूत
  • 2021 मध्ये झालेल्या WTC मध्ये टीम इंडिया न्यूझीलंडकडून पराभूत

असे हे अंपायर भारताला अपशकुनी सिद्ध होत असून रविवारी होणाऱ्या सामन्यात सुद्धा तेच पंच म्हणून कार्यरत आहेत.

आता भारत काय कामगिरी करतोय हे पाहावे लागेल

© PuneriSpeaks

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.