“अप्सरा आली” लावणीवर रोबोटिक अंदाजातील डान्स वायरल…

0
“अप्सरा आली” लावणीवर रोबोटिक अंदाजातील डान्स वायरल…

अतुल कुलकर्णी आणि सोनाली कुलकर्णी च्या अभिनयातून साकारलेला ‘नटरंग’ तुम्ही पाहिला असेलच, त्यातील “अप्सरा आली….” हे गाणे तर सर्वांच्या तोंडपाठ. त्या लावणीवर रोबोटिक डान्स कधी पाहिलाय का?

सुपर डान्सर’ हा सोनी टीव्हीवरील डान्स रिएलिटी शो आहे. यामध्ये मुस्कान या चिमुरड्या स्पर्धकाने रोबोट्च्या अंदाजामध्ये ‘अप्सरा आली’ या मराठी गाण्यावर अप्रतिम नृत्य सादर केलं आहे.

मुस्कान आणि पॉल या दोघांनी मिळून हा नृत्याचा अविष्कार साजरा केला. सध्या हा व्हिडिओ नेटवर धुमाकूळ घालत असुन त्यांच्या नृत्याला सर्वांनी भरभरून दाद दिली.


तर कसा वाटला तुम्हाला हा रोबोटिक डान्स… आम्हाला नक्की कळवा @PuneriSpeaks वर

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.