रोहित पवार आणि निलेश राणे यांच्यात ट्विटर वर वाकयुध्द

0
रोहित पवार आणि निलेश राणे यांच्यात ट्विटर वर वाकयुध्द
Spread the love

राष्ट्रवादी चे रोहित पवार आणि निलेश राणे यांच्यात ट्विटर वर साखर उद्योगास मदतीवरून चांगलीच जुंपली आहे. दोघांनीही एकमेकांवर टीका करत साखर उद्योगाचा विषय कुक्कुटपालन वर घेऊन गेले आहेत.

निलेश राणे यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘साखर उद्योगाला मदत करा’ या केलेल्या विधानावर निलेश राणे यांनी सडकून टीका केली.

साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले ह्यावर audit झालंच पाहिजे. साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षों वर्ष साथ देत आलेत. तरी वाचवा?? साखर उद्योगाला वाचवा; शरद पवारांचं मोदींना पत्र

निलेश राणे

या राणे यांच्या टिकेवर रोहित पवार यांनी आपल्या शैलीत चांगलेच उत्तर दिले.

मी आपणास सांगू इच्छितो की @PawarSpeaks साहेबांनी साखर उद्योगासह ‘कुक्कुटपालन’ व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत.साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात.
त्यामुळे काळजी नसावी.

रोहित पवार

या त्यांच्या टिकेवर निलेश राणेंनी रोहित पवार यांना प्रत्युत्तर दिले.

मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही… कुकुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोल्यावर मिरची का लागली??? मतदार संघावर लक्ष दे सगळी कडे नाक टाकू नकोस नाही तर साखरकारखान्या सारखी हालत होईल तुझी.

निलेश राणे

हे रोहित पवार सारखे शेंबडे लुडबुड करत असतात. साखरेवर बोललो की हे अस्वस्थ का होतात कुणास ठाऊक?? महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणात संपत्ती एका दिशेने जात असेल तर प्रश्न नाही विचारायचे?? ह्या वांग्याला सांगा ते ठाकरे मुंबईत राहून नाय काय करू शकले हा तर अजून स्वतःची धुवायला शिकतोय.

निलेश राणे

दोघांच्यात रंगलेले हे वाकयुध्द किती रंगतेय हे पाहावे लागेल.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on Telegram. Click here to join our channel and stay updated with the latest Biz news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.