- मुंबई: ब्राझीलीयन फुटबॉलपट्टू रोनाल्डिन्हो म्हणजे फुटबॉल चाहत्यांचा देवच, हा देव नुकताच प्रीमियर फुटसाल लीग निमित्त भारत दौऱ्यावर आहे
प्रीमियर फुटसाल लीग च्या दुसऱ्या मौसमाला नुकतीच सुरुवात झाली असुन रोनाल्डिन्हो हा दिल्ली ड्रॅगन संघाकडून खेळत असून त्यांनी आपल्या पहिल्याच सामन्यात मँचेस्टर युनायटेड चा प्रसिद्ध खेळाडू रॅन गिग्स च्या मुंबई वॉरियर्स ला हरवले आहे.
शुक्रवारी रोनाल्डिन्हो मुंबईत सिद्धिविनायक दर्शनाला गेला असता चाहत्यांनी त्याला गराडा घातला. जगभरात त्याचे चाहते असून बार्सिलोना चा हा माजी खेळाडू ballon d’Or विजेता असून अजून बरेच रेकॉर्डस् त्याच्या नावावर आहेत.
तो भारतीय दौऱ्यावर असणे म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच असणार आहे.