आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्यांना वेळेवर, मोठय़ा रुग्णालयात उपचार घेता आले नाहीत.
माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे विनंती केली आहे की आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या क्रीडापटूंना केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांचा (सीजीएचएस) लाभ मिळावा.
मोदींना (२४ ऑक्टोबरला) लिहिलेल्या पत्रामध्ये क्रीडापटूंना उतारवयात भेडसावणाऱ्या आरोग्याच्या समस्येवर प्रकाश टाकला. औषधोपचाराच्या अतिरिक्त खर्चाचा ताण त्यांच्यावर पडतो, असे म्हटले आहे. आपल्या पत्रातमध्ये सचिनने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या हॉकी संघांमध्ये समाविष्ट असलेले मोहम्मद शाहीद यांचे उदाहरण दिले आहे. जुलै महिन्यात एकापेक्षा जास्त अवयव निकामी झाल्याने शाहीद यांचा मृत्यू झाला होता. आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्यांना वेळेवर आणि मोठय़ा रुग्णालयात उपचार घेता आले नाहीत.
Anushka-Virat wedding, #VirushkaWEDDING trending on Tweeter with best memes
क्रीडापटूंना केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळण्याबाबत क्रीडा मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाशी चर्चा केल्याचे सचिनने त्याच्या पत्रात म्हटले आहे. त्यानंतर सचिनने पंतप्रधान मोदी यांना विनंती केली आहे.