बाप: आपल्या बापाला कधीच विसरू नका…अवश्य हा लेख वाचा

0
बाप: आपल्या बापाला कधीच विसरू नका…अवश्य हा लेख वाचा

आई-बाप आयुष्यभर राबतात आणि आपल्या मुलांना शिकवतात पण मुले…..

बाप……

परत एकदा प्लँटफॉर्मवर आपली किलकिली नजर टाकत एक आजोबा गाडीत चढले. खरतर त्यांनी पकडलेला हा डब्बा रिझर्व होता. शिवाय चालती ट्रेन पकडून जीव धोक्यात घातला होता. शरद बाजूच्याच सीटवर बसला होता.
“बराच वेळ बघतोय, तुम्ही प्लँटफॉर्मवर ट्रेन लागल्या पासून उभे होता आणि असा जीव धोक्यात घालून धावती ट्रेन पकडलीत ? शिवाय हा रिझर्व बोगी आहे. ” शरदचे बोलणे ऐकू गेले नाहीच जणू, असा चेहरा करून ते संडासाच्या दरवाज्या जवळ उभे राहीले. शरदने परत एकदा त्याचे बोलने रिपीट केले.
” वाट बघीत हूतय बाबा” थरथरता आवाज मन छेदून गेला.
“कोणाची?”
एवढ्यात तिथे टि सी आला. त्या माणसाजवळ तिकीट नव्हते. टिसीने नियम काढले. प्रवास भाडे आणि दंडाची रक्कम भरायला सांगीतले अन्यथा पुढच्या स्टेशनला उतरायला सांगीतले. ते आजोबा खुप गयावया करू लागला. एका कोनात बसून राहीन, कोणाला काही त्रास होणार नाही याची काळजी घेईन असं टिसीला सांगू लागले. शरदला ती गयावया पाहवेना. स्वत:जवळचे पैसे देवून त्यांचे तिकीट घेतले. डोळ्यात भरलेले पाणी आवरत ते आजोबा तसाच संडासच्या बाजूला उभा राहीले. पुढचे स्टेशन आले तशी गर्दी वाढली. धक्का बुक्की झाली. त्यात त्या आजोबांचा चष्मा तूटला. तुटलेल्या काचा गोळा करत अंग चोरून उभा राहीले. मग न राहवून त्यांना शरदने आपल्या सीटवर बसायला जागा देऊ केली. थ़ोडे संकोचत बसले. हातात छोटीशी बँग. जुनाट कपडे. थकलेले शरीर. गालफाटे बसलेली. अशी काहीशी दशा त्यांची होती.
आजोबा कोणाची वाट बघत होता.” परत एकदा शरदने विचारले.
ते बोलायला बघत होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हता. शरदने त्याच्याजवळचे पाणी पुढे केले. दिलेले पाणी घटाघटा संपवले. ते भुकेले होते हे स्पष्ट दिसत होते.
“माका लय भुक लागली हा. काय खावक गावात काय?” त्यांचा केवविलवाणा आवाज शरदला अस्वस्थ करून गेला.
शरदने क्षणाचाही विलंब न लावता त्याच्या जवळची पोळी भाजी त्यांना दिली.
त्या माणसाची लाज भुकेपुढे विरून गेली होती.

अनोळखी माणसाने दिलेल्या भाजी पोळीमुळे आपली पोटाची भूक भागली होती. पण मनाची भूक? ती आता भागणार नव्हती.
गाडी सुरू झाली. सकाळी मुंबईला आलेले नाना परत गावी निघाले होते. डोक्यात विचारचक्र चालूच होते. मुलगा परदेशी चालला म्हणुन नाना खुप खुश होते. आता आपली परीस्थिती सुधारेल असे वाटू लागले होते. दुसरीकडे पोर आपल्या पासून साता समुद्रापार जाणार या विचाराने काळीज कलकलले होते. त्याच्याशिवाय त्यांचे कोणीही नव्हते. मोठ्या कष्टाने त्याला शिकवून मोठे केले होते. आणि आज परदेशी जातोय हे नुसते कळवत होता. जाण्यापूर्वी एकदा भेटून जा असे सांगून पण कामाची सबब पुढे करत, नाही यायला जमणार असे सांगून मोकळा झाला होता. मग आपणच उसणवार पैसे घेवून मुंबईला यायला निघाले होते. एकदाही मुंबई शहराचे तोंड न पाहीलेल्या नानानी या मायानगरीत यायचे धारीष्ठ केवळ मुलासाठी दाखवले होते. निघताना नानांच्या बायकोने एक कळकट पितळेचा डबा पिशवीत ठेवला आणि माझ्या सोन्यालाच द्या असे सांगीतले होते. त्याच्या आवडीचे तांदळाच्या पिठाचे लाडू होते त्यात.

Read Also: पु लं च्या शब्दात… शून्यातून विश्व का विश्वातून शून्य….!!!!

रात्री एक दोन वेळा फोन पाहीला पण फोन काही वाजला नव्हता. पोर झोपला असेल अशी मनाची समजूत काढत रात्र काढली. सकाळी ८ वाजता ठाणे स्टेशनला उतरले तेव्हा मुलगा न्यायला तिथे येईल ही अपेक्षा फोल ठरली
फोन येईना. फोन बिघडला की काय? आजूबाजूला माणसेच माणसे पण आपला माणूस दिसेना. आपण असेच एकदा तो लहान असताना जत्रेत त्याच्या मुद्दाम नजरेआड झालो होतो. तेव्हा झालेला त्याचा केवीलवाणा रडका चेहरा नानांना आज परत आठवला होता. तशीच आपली परिस्थिती झाली होती का? आपला मुलगा पण माझी गंमत करत असेल का?
त्या विचारणे किंचितसे हसू पण आले. पण ते काही काळच टिकले. प्लँटफॉर्मवर लागणारे धक्के, इथे आम्हाला विचारणारे तुझं कोणी नाही याची जाणीव करून देऊ लागले.
नानानी धीराने घ्यायचे ठरवले. स्व:ताला धीर देत मुलाने सांगीतलेल्या पत्त्यावर जाण्यासाठी ट्रेन विचारू लागले. पण ट्रेनमध्ये चढायला जमत नव्हते.
Photo Credit's
आलेल्या गाड्या भरून जात होत्या. शेवटी कोणीतरी ठाणेहून सुटणाऱ्या ट्रेन मध्ये बसवून दिले. ट्रेनमधली रेटारेटी पाहून अंगावर काटा आला. कोणीतरी त्यांच्या पायावर पाय दिला तसे ते ओरडले.

” अहो आजोबा, काय झाले?” डोळ्यातील पाणी पाहून शरदने विचारले.
” काही सांगाल का?”
डोळ्यातले पाणी पुसत नाना आपली व्यथा सांगू लागले.
तुझ्याएवढा आमचा एकुलता एक मुलगा इथं मुंबईत मोठया कंपनीत इंजिनीअर आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने प्रेमविवाह केलाय. त्याची बायको शिकलेली, नव्या विचारांची आहे. तिला सासू-सासरे म्हणजे आम्ही गावठी (गावंढळ) वाटतो. तिला आमच्यासोबत राहणं आवडत नाही. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून मुलगा इथेच वेगळा राहतो. परवा त्याचा माझ्या मोबाईलवर फोन आला होता. म्हणाला, अमेरिकेत नोकरी मिळाली आहे. बायकोला घेऊन 10 वर्षांसाठी जात आहे.
इथं मुंबईत होता तेव्हा आम्हा म्हातारा म्हातारीला सहा महीण्यातून एकदा भेटायला गावी यायचा. मात्र आता इतक्या लांब परदेशात जाण्याआधी एकदा भेटून जा म्हटलं तर, वेळ नाही आता परवा लगेच विमानाने निघायचंय असं म्हणाला.
पुढचे 10 वर्ष जगतोय की मरतोय कोण जाणे.. म्हणून म्हटलं आपणच भेटून यावं मुंबईला जाऊन. काल संध्याकाळ पासून मी या मुंबईत विमानतळ शोधतोय. पण इथं कुर्लामध्ये विमानतळ नाही असं म्हणतायत इथली लोकं..!”
मी म्हणालो, “बरोबर म्हणतायत लोकं, कुर्लाला विमानतळ नाहीय, सांताक्रुजला आहे.
आजोबांनी लगेच खिशातून एक कागद काढला आणि म्हणाले, “परवा जेव्हा मुलाचा फोन आला होता तेव्हा त्याने मला विमानतळाचा हाच पत्ता दिला होता . हा मोबाईल पण खराब झालाय वाटतं. फोनच नाही येत कालपासून माझ्या मुलाचा. त्याला सांगितलं होतं मी मुंबईत येतोय तुला भेटायला.
शरदने तो मोबाईल आणि तो कागद पाहायला घेतला. त्याने आधी मोबाईलची बटणं दाबून पहिली. मोबाईल व्यवस्थित चालू होता नेटवर्क ही फुल होतं…
त्याने विचारलं, “तुम्ही नाही का लावून बघितला मुलाला फोन?”
“मला फोन लावता येत नाही, उचलता येतो फक्त” ते म्हणाले.
शरदने कॉल रजिस्टर मध्ये जाऊन परवा आलेला कॉल डायल केला. समोरून फोन कट करण्यात आला. नंतर तो कागद उघडून पाहिला. त्या कागदावर पत्ता होता- छत्रपती शिवाजी विमानतळ, एम एम हॉटेल समोर, कुर्ला पश्चिम, मुंबई.

मी समजून गेलो होतो, त्या मुलाने आपल्या आई वडिलांना टाळण्यासाठी खोटा पत्ता दिला होता आणि आता तो त्यांचा फोनही घेत नव्हता. मला कळून चुकलं होतं की ज्या विमानात आता त्यांचा मुलगा स्वार झाला होता ते परत कधीच त्यांच्या दिशेने येणार नव्हतं. त्याना कळले नसेल का? मुलाकडून होणारी त्यांची ही प्रतारणा, की त्यांना कळत असून ती स्वीकारायची नव्हती? कदाचित आपला पोटचा मुलगा आपल्यासोबत असा वागू शकतो यावर त्यांचा विश्वासच बसत नसेल..
आजोबांना मी म्हणालो, “आजोबा वाईट वाटून घेऊ नका. एव्हाणा तुमचा मुलगा परदेशात पोचला असेल .एका क्षणात त्यांचे डोळे भरून आले. शरदने त्यांचा थरथरता हात हातात घेवून धीर द्यायचा प्रयत्न केला.

इतक्यात गाडीला ब्रेक लागला त्याबरोबर नानांच्या काखेतली पिशवी खाली पडली. त्यातला पितळेचा डबा बाहेर पडला.
आता मात्र एका धारदार सुऱ्याने काळजात वार व्हावा आणि सर्व अंतःकरण रक्तबंबाळ व्हावं अशी शरदची अवस्था झाली. शरद निशब्द तसाच त्यांच्याकडे बघत बसून राहिला.
त्यानंतरच्या अनेक रात्री शरद नीट झोपू नाही शकला. राहून राहून एकच प्रश्न पडत होता…
आपल्याकडे भाकरीसाठी भीक मागणारा, भुकेने हतबल झालेला तो माणूस आपल्या मुलासाठी आणलेल्या त्या लाडवांच्या डब्यातल्या एक लाडू खाऊ शकत नव्हता का…? इतकं प्रेम????’ बापाचं प्रेम असचं असते. न कळणारं. अगदी फणसासारखे. सगळे काही विसरा पण आपल्या जन्मदात्या आई बाप यांना विसरू नका रे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

History of PUNE: पुण्याचा इतिहास, असे घडले पुणे…..!

कोंडाजी फर्जंद: फर्जंद चित्रपटातील मुख्य पात्र फर्जंद कोण होता? पन्हाळगड लढाई कशी झाली

अभिजात भाषा दर्जा म्हणजे काय? #अभिजातमराठी |

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.