माझे वडील मुस्लिम आणि आई हिंदु असून मी स्वतःला माणूस समजतो असे उत्तर सलमान खान ने त्याचा धर्म विचारला असता दिले आहे.
माझी आई सुशीला चरक ही हिंदु असून माझे वडील सलीम खान हे मुस्लिम आहेत. परंतु मी स्वतःला मानवी धर्माचा मानत असून मानवता हाच माझा धर्म आहे असे सूचक वक्तव्य सलमान खान ने HT च्या Leaderahip Summit मध्ये बोलताना दिले आहे.
बॉलीवूड मध्ये कोणताही धर्म चालत नसून सर्वजण मिळून मिसळून राहतात असेही तो म्हणाला.
याआधी सलमान खानने माझा धर्म भारतीय असल्याचे एका कार्यक्रमात म्हणले होते.
‘पद्मावती’ चित्रपटाच्या वादाबद्दल सुद्धा सलमान बोलला असून लोकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे असे तो म्हणाला परंतु चित्रपट पाहण्याआधी निष्कर्ष काढणेही चुकीचे असल्याचे तो म्हणाला.
माझी आई हिंदु आणि वडील मुस्लिम असले तरी मी मानवी धर्म मानतो: सलमान खान
