सलमान खान बॉलीवूड मध्ये कमाईचा बादशहा..

0
सलमान खान बॉलीवूड मध्ये कमाईचा बादशहा..


फोर्ब्स इंडिया १०० सेलेब्रिटीजची यादी जाहिर केली
, त्यामध्ये सलग दुसऱ्या वर्षी सलमान खानने बाजी मारली आहे. या यादीमध्ये सलमान खान २३२.८३ करोड रुपये कमाई करत पहिल्या स्थानावर आहे.

त्यामध्येच, शाहरुख खान १७० करोड़ रुपये कमाई करत दुसऱ्या स्थानावर आहे. २०१६ मध्ये सलमानच्या ‘सुलतान’ या फिल्मने ५९० करोड रुपये कमावले होते. २०१७ मध्ये जून महिन्यामध्ये प्रदर्शीत झालेल्या ‘ट्यूबलाईट’ या फिल्मने २११ करोड रुपये कमावले होते.

फोर्ब्सच्या या यादीमध्ये तिसऱ्या नंबरवर विराटाचे कोहली चे नाव आहे. त्याची कमाई १०० करोड रुपये आहे. अक्षय कुमार ९८ करोड़ रुपये कमाईसह चौथ्या स्थानावर आहे. सचिन तेंडूलकर या यादीमध्ये पाचव्या स्थानावर आहे. ही फोर्ब्स इंडिया ची सहावी सेलिब्रिटी १०० लिस्ट आहे.

याच यादीमध्ये आमिर खान सहाव्या तर प्रियांका चोपडा सातव्या स्थानावर आहेत. क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी करीब ६४ करोड़ रुपये कमाई सोबत आठव्या स्थानावर आहे.

तसेच ऋतिक रोशन नवव्या आणि रणवीर सिंह दहव्या नंबर वर आहेत.

साउथ इंडिया मधील फिल्म इंडस्ट्रीज चे सुद्धां १३ एक्टर्स या यादीमध्ये सहभागी आहेत. गेल्या वर्षी या यादीमध्ये ११ लोकांना जागा दिली होती.

IIFA च्या ऑफिसियल ट्विटर वर सलमान व रितेश चा एक अप्रतिम फोटो

 

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.