भारतीय स्मार्टफोन बाजार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मोबाइल उत्पादक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नियमितपणे नवनवीन मॉडेल बाजारात आणत आहेत. परंतु नवीन मोबाईल घेताना मागे लागणारी कंपनी मोबाईल घेतल्यानंतर ग्राहकाला सर्विस देत नसल्याच्या अनेक तक्रारी येतात.
Samsung Poor Service
अनेक ग्राहक ग्राहक सेवेच्या केंद्रांना एवढे कंटाळतात कि खाजगी दुकानातून आपला मोबाईल दुरुस्त करणे सोयीस्कर समजतात. ग्राहकांना मोबाईल घेतल्यानंतर जर काही समस्या आली तर मग ग्राहक सेवा केंद्राच्या येरझाऱ्या घालून ग्राहक वैतागतो हे नक्कीच. अशीच एक घटना नुकतीच एका ग्राहकाच्या बाबतीत घडलेली दिसत आहे. सॅमसंग या नावाजलेल्या कंपनीचा फोन घेतलेल्या ग्राहकाला सेवा केंद्राने केलेल्या टाळाटाळीने मनस्ताप करायला भाग पडले आहे. २१००० रुपये खर्च करून घेतलेला Samsung A7 काही दिवसानंतर तो चालायचा बंद झाला. पुढे काय झाले हे खुद्द ग्राहकाच्या तोंडातूनच ऐका
ग्राहकाने उचललेले हे पाऊल आपल्याला कसे वाटले? आपल्याला असा काही अनुभव असेल तर आम्हाला नक्की कळवा.
©PuneriSpeaks
अशाच अनेक अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटर आणि इंस्टाग्राम आम्हाला नक्की फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
श्रीकांत कर्वे: ५३ बेजबाबदार लाचखोर RTO अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणारे आजोबा