सातारा शहरात आमदार आणि खासदार गटात जी धुमश्चक्री झाली त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सातार्यात चोख पोलिस बंदोबस्त आहे. या घटनेतील प्रमुख संशयीतांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.दिवसभरात कोठे ही अनुचित घटना घडलेली नसून सातारकरांनी कोणत्या ही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी केले.
प्रसार माध्यमांशी कालच्या (गुरुवार मध्यरात्रीच्या घटनेवर ) बोलताना ते पुढे म्हणाले , पोलिसांनी अनेवाडी टोल नाक्यावरील परिस्थीती अत्यंत संयमाने हाताळली त्यामूळे कायदा सुव्यवस्थेचा फारसा प्रश्न निर्माण झाला नाही.खा.उदयनराजे भोसले आणि त्यांच्या समर्थकांसह पोलिस सातार्यात दाखल झाले.चार ठिकाणी त्यांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न झाला.मात्र मध्यरात्री एक च्या दरम्यान खा.भोसले व आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये धुमश्चक्री झाली . या घटनेमूळे सातार्यात जलमंदीर आणि सुरुची या शुक्रवार पेठेतील लोकप्रतिनिधींच्या निवासस्थान परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.या घटनेतील दोषींवर कारवाई निश्चीत होणार या करीता काही ठिकाणचे सीसी टीव्ही फुटेज तपासले जात आहे.शाहुपूरी पोलिस ठाण्याचे निरिक्षक किशोर धुमाळ यांना धक्काबुक्की झाल्याने संबंधितांवर सरकारी कर्मचार्याला कर्तव्यावर असताना दुखापत करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आमदार गटाकडून विक्रम पवार व खासदार गटाकडून अजिंक्य मोहिते यांनी आमदार व खासदारांच्या गटांवर परस्पर विरोधी तक्रारी दिल्या आहेत.पोलिस पथके रवाना करण्यात आली असून नक्की किती नुकसान झाले याचे पंचनामे करण्याच्या सूचना संबंधितांवर देण्यात आल्या आहेत.या घटनेत गोळीबार झाल्याची माहिती असून त्याचा ही तपास गांभीर्याने सुरु असल्याचे संदीप पाटील यांनी स्पष्ट केले.