सासवड, पुणे : थापा मारून मारून किती मारायच्या….. अहो, मोदी चहा विकून पंतप्रधान झाले, अशी सरळ सरळ थाप मारतात. त्यांनी चहा विकल्याचा पुरावा दिल्यास मी खासदारकीचा राजीनामा देईन आणि पूर्णपणे राजकारणातून संन्यास घेईन, असे थेट आव्हान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांना दिले आहे दिले.
राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरंदर व हवेली तालुक्यातील शिवसेनेच्या शाखाप्रमुखांपासून सर्व पदाधिकाऱयांचा मेळावा सासवडला (ता.पुरंदर) आचार्य अत्रे भवनात होता, त्यानिमित्ताने बोलताना त्यांनी मोदींवर आसूड ओढले.
भंपकपणा, खोटारडेपणाची भाजपा ने पातळी ओलांडली आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
शरद पवार यांच्या कारकिर्दीचा आढावा…..?
खोटेपणा करत जनतेला गंडवत राहायचे आणि महाराष्ट्रातून पैसा घेऊन जाऊन पुन्हा मराठी माणसांच्या खच्चीकरणासाठी आणि पराभवासाठी वापरायचा, हा भाजपचा रोजचा धंदा झाल्याची टीका त्यांनी केली. मात्र आता दिवस बदलले असून लोक भाजपच्या आणि मोदींच्या भुलथापांना बळी पडणार नाहीत, 2019 च्या निवडणुकीपूर्वीच भाजप कालबाह्य होईल. संपूर्ण ताकतीनिशी शिवसेना संपूर्ण राज्यात बहुमताने निवडुन येईल, असे सुतोवाच संजय राऊत यांनी येथे केले.
राम मंदिर वही बनाएंगे..Avengers: Infinity War ट्रेलर नंतर ट्विटर वर मीम चा तडका..