संजय राऊत आशिष शेलार वाद: PNB घोटाळ्यावरून शिवसेना भाजप मध्ये जुंपली

0
संजय राऊत आशिष शेलार वाद: PNB घोटाळ्यावरून शिवसेना भाजप मध्ये जुंपली

संजय राऊत आशिष शेलार वाद

नीरव मोदी भारतातून ११ हजार कोटींचा चुना लावून पळाला, ललित मोदी पळाला, एक मोदी आहेत जे येऊन जाऊन असतात. असे ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. त्यानंतर भाजपाने नेहमीच्या शैलीत प्रत्युत्तर दिले. भाजपा नेते आशिष शेलार यांनी “प्रभादेवीच्या गल्लीत काहींना मोदी या शब्दाशी यमक जुळवणारे काव्य सुचले आहे. तेव्हाच कळले की शिमगा जवळ आला आहे. तसा वर्षभर यांचा शिमगाच असतो म्हणा. पण उगाच यमकासाठी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नका ती थुंकी तुमच्याच तोंडावर पडेल” असा ट्विट करत आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत ट्विट:

आशिष शेलार ट्विट:

शिवसेना आणि भाजप यांचे वाकयुद्ध असेच चालु असुन शिवसेना मुखपत्र सामना मध्ये आजच नीरव मोदीलाचा रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा असा खोचक सल्ला देण्यात आला आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

ट्वीटर वर मराठी म्हणी चा जागर #म्हणी

मराठी भाषा पंधरवडा ला ट्विटर वर सुरुवात

मराठीच्या जतनासाठी गांभीर्याने पाऊले उचलण्याची गरज. केरळ, कर्नाटक, TN भाषा संवर्धनात महाराष्ट्राच्या पुढे : भाषा अभ्यास समिती

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.