सरपंच ऋतुराज देशमुख यांनी कसं केलं गाव कोरोनामुक्त?

0
सरपंच ऋतुराज देशमुख यांनी कसं केलं गाव कोरोनामुक्त?
Share

तरुण सरपंच ऋतुराज देशमुख यांच्याबद्दल माहिती आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 मे ला केलेल्या संबोधनावेळी ऐकली असेल. तरुण सरपंच ऋतुराज देशमुख यांचे कार्य याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केलेले आपण ऐकलेच आहे.

सरपंच ऋतुराज देशमुख माहिती

संपूर्ण नाव ऋतुराज रवींद्र देशमुख हे वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी सरपंच झाले आणि सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. ते घाटणे गाव (जिल्हा सोलापूर, तालुका मोहोळ) चे सरपंच असून गावकऱ्यांनी कमी वयातच त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आणि त्यांनी त्याचे सोने केले.

सरपंच ऋतुराज देशमुख माहिती Ruturaj Deshmukh Information in Marathi
घाटणे गाव लसीकरण

वयाच्या 21 व्या वर्षी पॅनेल उभे करत पॅनेल जिंकवत सरपंच बनणे काही सोप्पी गोष्ट नाही. त्यांनी हा पराक्रम करत सर्व महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले.

सरपंच ऋतुराज देशमुख यांनी कोरोनामुक्त गाव कसे केले?

गावात वाढत चाललेला कोरोना हद्दपार करण्यासाठी सरपंच यांनी एक योजना तयार करत मोहीम आखली. ‘बी पॉझिटीव्ह, गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह’ ही मोहीम राबवत गावाला कोरोनामुक्त केले.

गाव कोरोनामुक्त करण्यासाठी त्यांनी खालील कार्य हाती घेतले.

  1. गावातील नागरिकांच्या अँटीजन टेस्ट केल्या
  2. आशा सेविका यांची मदत घेत घरोघरी जाऊन नागरिकांचे तापमान आणि ऑक्सिजनची पातळी तपासली.
  3. गावातील प्रत्येक कुटुंबाला कोरोना सेफ्टी किट वाटप केले. कोरोना सेफ्टी किट मध्ये मास्क, सॅनिटायझर, साबण या वस्तूंचा समावेश केला.
  4. लोकांना मास्क आणि सॅनिटायझर वापरण्यास बंधनकारक केले
  5. बाहेर गावातून येणाऱ्या व्यक्तीस सक्तीचं 3 दिवसांचं क्वारंटाईन.
  6. गावातील 45 वर्ष वयावरील नागरिकांसाठी लसीकरण कॅम्प आयोजित केले.
Sarpanch Ruturaj Deshmukh Grampanchayat Ghatne
कोरोना सेफ्टी किट

असे काही नियम पाळत तरुण सरपंचांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने गाव कोरोनामुक्त करत गावचा ठसा उमटवला.

तर या तरुण सरपंचाने राबवलेली कोरोनामुक्त गाव साठी मोहीम आपणांस कशी वाटली? आपल्या गावातील सरपंच अशा कोणत्या मोहीम राबवत असतील तर आम्हाला नक्की सांगा. खाली कॉमेंट करायला विसरू नका.

अशा अनेक लेखासाठी आमच्या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देत जा. आणि लेख शेअर केल्यास आम्ही सदैव ऋणी राहू…

©PuneriSpeaks

Like us on FB PageTwitter, and Instagram

MORE Funny Memes:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.