काश्मीर ते सातारा: काश्मिरची मुलगी झाली साताऱ्याच्या पाटलांची सून

0
काश्मीर ते सातारा: काश्मिरची मुलगी झाली साताऱ्याच्या पाटलांची सून
Share

काश्मीर ते सातारा: साताऱ्याचा मुलगा आणि काश्मीरची मुलगी अशी अनोखी प्रेमकहाणी सध्या चर्चेत असून कलम ३७० आणि लॉकडाऊन चा अडथळा पार करत दोघांनी धुमधडाक्यात विवाह केला आहे.

Ajit Patil and Suman Devi Love story

आपल्या सातारच्या पठ्ठया अजित पाटील (Ajit Patil) ला कलम ३७० रद्द केल्याचा फायदा झाला असून त्याने काश्मीरची मुलगी सुमन देविसोबत (Suman Devi) प्रेमाची गाठ बांधली आहे. भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या कराडच्या अजित पाटील याने काश्मीरच्या सुमन देवीसोबत विवाह करत काश्मीरचे जावी होण्याचा मान मिळवला आहे.

अजित पाटील आणि सुमन देवी यांचे लग्न कुठे झाले?

किस्तवाड, जम्मू काश्मीर मध्ये काश्मिरी पद्धतीने लग्नाची गाठ बांधत पुन्हा कराड, सातारा मध्ये सप्तपदी करत अजित आणि सुमन लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.

२७ नोव्हेंबर २०२० रोजी नातेवाईकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा जम्मू काश्मीर मध्ये पार पडला.

Kashmir Suman Devi Marries Satara Ajit Patil

अजित पाटील आणि सुमन देवी यांचे कसे जुळले?

उंडाळे गावचा अजित पाटील हा भारतीय सैन्य दलात सैनिकी शिक्षणाचे प्रशिक्षण देतो. झाशी मध्ये कार्यरत असताना काश्मीरच्या सहकाऱ्याकडे पाहुणी म्हणून आलेल्या सुमन देवी भगतशी त्यांची पहिली भेट झाली. जम्मू कश्मीरमधील किस्तवाड जिल्ह्यातील जोधानगर पलमार गावात सुमन देवी भगत राहतात. दोघांचे प्रेम येथूनच सुरु झाले आणि शेवटी विवाह बंधनात अडकले.

काश्मीर ते सातारा ते काश्मीर: लॉकडाऊन मुळे झाली पक्की गाठ

कराडचे अजित पाटील हे मार्च २०२० लॉकडाऊनल आधी सुमनच्या नातेवाईकासोबत 10 दिवसाच्या सुट्टीवर जम्मू काश्मीरला गेले आणि लॉकडाऊन मुळे तिथेच अडकले. तीन महिन्यात अजित आणि सुमन यांचे नाते अधिक घट्ट होत गेले आणि सुमनच्या घरच्यांनी सुद्धा अजितला आपला जावई करून घेण्यास संमती दिली.

सातारा जिल्ह्यात मात्र या लग्नाची चांगलीच चर्चा होत आहे.

सरकारने जर 370 कलम हटवले नसते तर आम्ही लग्न करु शकलो नसतो. 370 कलम हटवल्याचा सर्वात जास्त फायदा मला झाला.

अजित पाटील

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.