Satara Corona: डॉक्टरांना धक्काबुक्की करून कोरोना बाधिताची कृष्णेच्या पात्रात आत्महत्या

0
Satara Corona: डॉक्टरांना धक्काबुक्की करून कोरोना बाधिताची कृष्णेच्या पात्रात आत्महत्या
Share

Satara Corona बिकट परिस्थिती सुरू असतानाच एका रुग्णाने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एका रुग्णाने कोरोना आजाराला कंटाळून व नैराश्यातून रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य सेविकेला धक्काबुक्की व मारहाण करत रुग्णालयातून पळ काढला आणि पळून जाऊन कृष्णा नदीपात्रात उडी मारत आत्महत्या केली.

Satara Corona | नक्की काय घडले?

पाचवड तालुका वाई येथील ६५ वर्षीय जेष्ठ नागरिक यांना चार दिवसांपूर्वी कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. कोरोना लागण झाल्याचे समजल्याने त्यांना वाई येथील संचित कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. हळूहळू त्यांच्या प्रकृती सुधारली होती. शनिवारीच्या रात्री आपल्या मुलाला फोन करून तब्बेत चांगली असल्याचे सुद्धा त्यांनी कळवले होते. मला बरे वाटत असल्याने मला आता घरी घेऊन जा, असे सांगितले होते. मात्र त्यांचवेळी करोनामुळे त्यांना नैराश्यही आले होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्येचा विचार देखील बोलून दाखवला होता.

अचानक रविवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास रुग्णालयातून ऑक्सिजन यंत्रणा काढून फेकून देत आरोग्य सेविका तसेच डॉक्टर यांना धक्काबुक्की करून ते अचानकपणे पळून गेले. डॉक्टरांनी रात्रगस्तीवरील पोलिसांच्या मदतीने पकडले आणि माघारी रुग्णालयात आणले. यानंतर त्यांची समजूत घालण्यात आली आणि झोपवण्यात आले. याची माहिती नातेवाईकांना सुद्धा देण्यात आली आणि पुन्हा असे होऊ नये यासाठी त्यांना खाटेला बँडेज पट्टीच्या साहाय्याने बांधून ठेवण्यात आले.

कोरोना झाल्याची वाईट भावना त्यांच्यात निर्माण झाली होती. ते वारंवार घरी सोडण्याची विनंती करत होते परंतु उपचार व इंजेक्शनचा डोस बाकी असल्याने घरी सोडणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी त्यांना सांगितले. दोन-तीन दिवसांनी तुम्हाला घरी सोडू असेही समजावण्यात आले.

अचानक दुपारी त्यांनी पुन्हा ऑक्सिजन यंत्रणा काढून टाकत रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य सेविकांना धक्काबुक्की करत पळून गेले. बँडेज पट्ट्या तोडून खाटेवरून उठून डॉक्टर व आरोग्य सेविकेला धक्काबुक्की व मारहाण देखील केली. पळून जाऊन लगतच्या कृष्णा नदी पात्रात उडी मारली. रुग्णालयातील डॉक्टर आणि सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना नदीपात्रातून बाहेर काढून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले. नाकातोंडात पूर्णपणे पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.