सातारा जिल्ह्यात शुक्रवारी एकही कोरोना बाधित सापडला नव्हता परंतु शनिवारी सकाळी आलेल्या अहवालात तब्बल 40 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यानंतर दिवसभरात 6 आणि 26 असे नवीन रुग्ण सापडले आहेत. आता जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या 275 वर गेली आहे. सध्या 154 जणांवर उपचार सुरू आहेत. तर आत्तापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात निर्बंध वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोना वाढीचा दर आटोक्यात आला होता परंतु आता वाढलेल्या रुग्णांमुळे अनेक भाग कंटेन्मेंट झोन मध्ये गेले आहेत. सातारा केंद्रस्थानी असलेल्या शाहूपुरी मध्ये सुद्धा रुग्ण आढळल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण आहे. शाहूपुरी मध्ये माय लेकीला कोरोना झालेला आहे. दोघींचा संपर्क रायघर येथील बधितांशी आलेला होता. या दोघी माय-लेकींनी मुंबई-सातारा प्रवास रायडर बाधितांसोबत केला होता.
सकाळी आलेल्या अहवालानुसार पाटण, कऱ्हाड, सातारा या तालुक्यात इतर जिल्ह्यातून आलेल्यांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बहुतांश बाधित हे मुंबई तसेच बाहेरून प्रवास करून आल्याचे दिसून येते. पाटण तालुक्यातील 15, कऱ्हाड तालुक्यात 3 बाधित सापडले आहेत. पाटण तालुक्यातील डेरवन येथील दहा महिन्याच्या बालक कोरोना मुक्त झाल्यानंतर पाटण तालुका कोरोना मुक्त बनला होता. मात्र, बनपुरी, धामणी आदी सह आज नव्याने 15 रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.
या सापडलेल्या रूग्णांमध्ये तालुक्यातील म्हासोली, पाटणसह खंडाळा तालुक्यातील पारगाव- खंडाळा, पिंपोडे, वाई तालुक्यातील वासोली, सातारा मधील शाहूपुरी, जकातवाडी, खावली येथील रुग्णांचा समावेश आहे.बहुतांश रुग्ण मुंबई, जळगाव आदी ठिकाणाहून प्रवास करून आलेले समजते.
सातारा पॉझिटिव्ह आढळलेले तालुकानिहाय रुग्ण माहिती (सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार) :
- पाटण 18 – पाटण शहर 15, गमेवाडी 2, भलेकर वाडी 1
- खंडाळा तालुका 4 – पारगाव 2, येणे वाडी 1, घाटदरे 1
- कराड तालुका 3 – मासोली 1, उंब्रज 1, बाचोली 1
- फलटण तालुका 4 – कोळकी 4
- मान तालुका 3 – शीबजाव 2, लोधवडे 1
- कोरेगाव तालुका 2 – पिंपोडे 1, कोरेगाव 1
- सातारा तालुका 5 – जकातवाडी 1, शाहूपुरी 2, गडकरआळी 2
- वाई तालुका 1 – वासोली 1
दिवसभरात 6+26 सापडलेल्या रुग्णांची गावे उशिरापर्यंत समजली नाहीत.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.