SATARA CORONA UPDATE: सातारा जिल्हा कोरोना स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. SATARA CORONA CASES दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. सातारा जिल्हा माहिती कार्यालय यांच्याकडून रोजच्या रोज कोरोना संख्या प्रकाशित करण्यात येते.
SATARA CORONA CASES TODAY
SATARA CORONA UPDATE | DATE : 18 June 2020 |
TODAYS CORONA CASES | 18 |
ACTIVE CORONA CASES | 157 |
TOTAL CORONA CASES | 791 |
TODAY CORONA FREE CASES | 20 |
TOTAL CORONA FREE CASES | 593 |
CORONA DEATH CASES | 39 |

सध्या सातारा जिल्ह्यात 593 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 157 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान आज जिल्ह्यात 130 कोरोना संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर आतापर्यंत जिल्हयात एकूण 8437 लोकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.
सातारा कोरोना उपचार केंद्र
- क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय
- ग्रामीण रुग्णालय वाई
- वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड
- उपजिल्हा रुग्णालय फलटण
- ग्रामीण रुग्णालय कोरेगाव
वरील रुग्णालयात नमुने घेतले जाऊन तपासणीसाठी NCCS पुणे किंवा कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे तपासणीस पाठवले जातात. 24 तासांच्या आत नमुन्यांच्या निकाल NCCS पुणे किंवा कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील तपासणी केंद्रावरून मिळतो.
सातारा जिल्हा कोरोना प्रसार प्रत्येक तालुक्यात झाला आहे. सातारा जिल्ह्यातील कोरोना हॉटस्पॉट म्हणून कराड तालुक्यातील म्हासोली गाव प्रसिद्धीस आले आहे. या गावात मार्चमध्ये युवक आला होता. तो ढेबेवाडी भागातील आसपासच्या गावात फिरल्याने आजूबाजूच्या गावात कोरोना प्रसार झाला होता. म्हासोली गावातील 16 जण कोरोना बाधित झाले होते.
शनिवारी दिवसभर आलेल्या अहवालात तब्बल 72 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. सातारा जिल्हा कोरोना संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून सातारा जिल्ह्यात निर्बंध वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शाहूपुरी मध्ये माय लेकीला कोरोना झालेला होता. दोघींचा संपर्क रायघर येथील बधितांशी आलेला होता. या दोघी माय-लेकींनी मुंबई-सातारा प्रवास बाधितांसोबत केला होता.
सातारा आज कोरोना बाधित रुग्ण तालुका निहाय व गाव निहाय आकडेवारी
18 जून 2020 माहिती: 18 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह पैकी एकाचा मृत्यू
कृष्णा मेडिकल कॉलेज कराड व एन. सी. सी. एस. पुणे येथे तपासणी करण्यात आलेल्या 17 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असून, यामध्ये खटाव तालुक्यातील वाकळवाडी येथील 61 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
यामध्ये कराड तालुक्यातील वडगांव (उंब्रज) येथील 59 वर्षीय पुरुष, तारुख येथील 22 वर्षीय पुरुष, येळगाव येथील 65 वर्षीय पुरुष, गोवारे येथील 39 वर्षीय पुरुष,सैदापूर येथील 29 वर्षीय पुरुष, सुपने येथील 37 वर्षीय महिला
पाटण तालुक्यातील कराटे येथील 59 वर्षीय पुरुष,
कोरेगाव येथील 39 वर्षीय महिला
फलटण तालुक्यातील शेऱ्याचीवाडी ( हिंगणगाव ) येथील 10 वर्षीय मुलगा,
माण तालुक्यातील दहिवडी येथील 39 वर्षीय पुरुष, 21 व 17 वर्षीय तरुण
खटाव तालुक्यातील शिरसवाडी येथील 4 वर्षाची बालीका व 32 वर्षीय महिला
सातारा तालुक्यातील आरे तर्फ परळी येथील 55 वर्षीय पुरुष
वाई तालुक्यातील कडेगाव येथील 74 वर्षी महिला.
खटाव तालुक्यातील वाकळवाडी येथील 61 वर्षीय पुरुष 14 जून रोजी मुंबईहून आला , वाकळवाडी गावात घरीच विलगीकरणात होता , ताप व श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पीएचसी निमसोड ने 17 जून ला कराड कृष्णा येथे पाठवले, आज सकाळी 11 वा उपचार चालू असताना मृत्यू झाला
16 जून 2020 माहिती: आज 21 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह, आज आलेल्या रिपोर्टनुसार कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड व एन. सी. सी. एस. पुणे येथे तपासणी करण्यात आलेल्या 21 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर कळविले आहे.
यामध्ये औरंगाबाद जिल्यातील 21 वर्षीय तरुण
देहू माळवाडी ता. हवेली जि. पुणे येथील 48 वर्षीय महिला.
कराड तालुक्यातील मालखेड येथील 60 वर्षीय पुरुष, तारुख येथील 50 वर्षीय पुरुष, तुळसण येथील 28 वर्षीय पुरुष, 25 व 53 वर्षीय महिला, 5 वर्षीय मुलगी.
वाई तालुक्यातील बावधन (शेलारवाडी) येथील 49 वर्षीय महिला, 25 वर्षीय पुरुष.
कोरेगांव तालुक्यातील पवारवाडी येथील 48 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय महिला, 21 वर्षीय तरुणी, 17 वर्षीय तरुण.
खटाव तालुक्यातील मायणी येथील 37 वर्षीय पुरुष.
फलटण तालुक्यातील वडले येथील 25 वर्षीय महिला.
जावली तालुकयातील गांजे येथील 48 वर्षीय महिला .
पाटण तालुक्यातील उरुल येथील 31 वर्षीय पुरुष.
सातारा शाहूनगर येथील 45 वर्षीय महिला, 15 वर्षीय तरुण व वाडेफाटा येथील 67 वर्षीय पुरुष.
आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एकूण 766 झाली असून कोरोनातून बरे झालेल्या 562 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार सुरु असणाऱ्यांची संख्या 169 इतकी झाली आहे तर 35 जणांचा मृत्यु झालेला आहे.
14 जून 2020 माहिती: जिल्ह्यात 10 नागरिक कोरोना बाधित तर यातील दोंघांचा मृत्युपश्चात रिपोर्ट कोरोनाबाधित
आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये विविध रुग्णालयांमध्ये दाखल असणाऱ्या 10 नागरिकांचे रिपोर्ट कोरोनाबाधित आले असून यातील जावळी तालुक्यातील गांजे येथील 48 वर्षीय पुरुष व रविवार पेठ फलटण येथील 70 वर्षीय महिला या 2 कोरोना बाधितांचा घरीच मृत्यू झाला असून त्यांचे रिपोर्ट मृत्यपश्चात पाझिटिव्ह आले आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्णांमध्ये साताऱ्यातील शाहूनगर येथील 52 वर्षीय पुरुष.
कोरेगाव तालुक्यातील पवारवाडी येथील 65 वर्षीय पुरुष, चोरगेवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, ग्रामीण रुग्णालयातील 53 वर्षीय महिला स्वच्छता कर्मचारी
जावळी तालुक्यातील गांजे येथील घरीच मृत्यू झालेला 48 वर्षीय पुरुष .
फलटण येथील मंगळवार पेठ येथील 62 वर्षीय सारीचा पुरुष, व रविवार पेठ येथील घरीच मृत्यू झालेली 70 वर्षीय महिला
खटाव तालुक्यातील वडगाव येथील 57 वर्षीय महिला, व बोंबाळे येथील 29 वर्षीय पुरुष
पाटण तालुक्यातील दिवशी बुद्रुक येथील 31 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
12 जून 2020 माहिती: 14 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह, विविध रुग्णालयांमध्ये दाखल असणाऱ्या 14 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
बाधित रुग्णांमध्ये फलटण तालुक्यातील वडले येथील 24 वर्षीय पुरुष.
कराड तालुक्यातील तुळसण 50 वर्षीय व 22 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष
सातारा तालुक्यातील गोजेगाव येथील 74 वर्षीय पुरुष, कारंडवाडी येथील 23 वर्षीय महिला व 5 वर्षाची मुलगी, सैदापूर येथील 23 वर्षीय पुरुष, खिंडवाडी येथील 44 वर्षीय महिला
कोरेगाव तालुक्यातील साप येथील 39 वर्षीय पुरुष
जावली तालुक्यातील धोंडेवाडी येथील 51 वर्षीय महिला व 25 वर्षीय पुरुष
खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथील 53 वर्षीय पुरुष
वाई तालुक्यातील वेळे येथील 50 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 718 रुग्ण आढळले आहेत. 472 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयांमध्ये 213 जणांवर उपचार सुरु असून 31 जणांचा मृत्यु झालेला आहे.
11 जून 2020 माहिती: जिल्ह्यातील 13 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह तर त्यातील एक मृत्यू पश्चात पॉझिटिव्ह
महाबळेवर तालुक्यातील कुरोशी येथील 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू पश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. तसेच खटाव तालुक्यातील निढळ येथील 20 वर्षीय गरोदर स्त्रीचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
बाधित रुग्णांमध्ये फलटण तालुक्यातील वडाळे येथील 40 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगा, 1 वर्षीय बालक, 89 व 30 वर्षीय पुरुष, बरड येथील 23 व 26 वर्षीय पुरुष.
खटाव तालुक्यातील निढळ येथील 20 वर्षीय महिला.
महाबळेश्वर तालुक्यातील कुरोशी येथील 55 वर्षीय पुरुष (मृत) या व्यक्तिने गळपास घेवून काल आत्महत्या केलेली होती. मृत्यू पश्चात त्याच्या स्त्रावाचे नमुने घेतले होते त्याचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
वाई तालुक्यातील आसरे येथील 55 वर्षीय पुरुष
जावली तालुक्यातील ओझरे येथील 5 वर्षाची मुलगी, 34 वर्षीय पुरुष व 25 वर्षाची महिला यांचा समावेश आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 703 रुग्ण आढळले आहेत. 448 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयांमध्ये 223 जणांवर उपचार सुरु असून 30 जणांचा मृत्यु झालेला आहे.
10 जून 2020 माहिती: 18 जणांना आज सोडले घरी; 25 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
तर 101जणांच्या स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीसाठी
कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 8, कोराना केअर सेंटर खावली येथील 1, क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णाल, सातारा येथील 2, कोरोना केअर सेंटर, फलटण येथील 4, पार्ले ता. कराड येथील कोरोना केंअर सेंटर मधील 1, सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथील 2 असे असे एकूण 18 जणांचा रुग्णालयातून दहा दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणाऱ्यांमध्ये पाटण तालुक्यातील नंदगाव येथील 67 वर्षीय पुरुष, कुंभारगाव येथील 27 वर्षीय पुरुष, गलमेवाडी येथील 24 वर्षीय महिला गावडेवाडी येथील 27 वर्षीय पुरुष, धामणी येथील 31 वर्षीय पुरुष, माण तालुक्यातील दहिवडी येथील 50 व 58 वर्षीय पुरुष
वाई तालुक्यातील दहयाट येथील 53 वर्षीय पुरुष.
खावली केअर सेंटर, सातारा येथील सातारा तालुक्यातील चाळकेवाडी येथील 30 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
क्रांतीसिंह नाना पाटील येथे दाखल अणाऱ्या 70 वर्षीय पुरुष व 8 वर्षीय मुलगा.
कोरोना केअर सेंटर फलटण येथील 34 व 60 वर्षीय महिला, 9 वर्षांचे दोन मुले
पार्ले कोरोना केंअर सेंटर मधील 1 महिला
सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथील 21 वर्षीय पुरुष व 44 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारुण रुग्णालय, सातारा येथील 13, पानमळेवाडी येथील 1, शिरवळ येथील 17, कराड येथील 4, वाइै येथील 7, रायगाव येथील 7, मायणी येथील 16, बेल एअर पाचगणी येथील 5, दहिवडी येथील 7, फलटण येथील 19 व कोरेगाव येथील 5 असे एकूण 101 जणांच्या घशातील नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील खरोशी येथे मुंबई वरुन प्रवास करुन आलेल्या 55 वर्षीय पुरुषाचा बेल एअर हॉस्पीटल पाचगणी येथे मृत्यु झाला आहे. या 55 वर्षीय पुरुषाचा नमुनाही तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे आज तपासणी करण्यात आलेल्या 25 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
30 मे 2020 माहिती: तांबवे ता. फलटण येथील 94 वर्षीय रुग्णाचा मृत्यू पश्चात रिपोर्ट आला आहे. तांबवे ता. फलटण येथील 94 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता. मृत्यू पश्चात स्त्राव तपासणी घेतले होता . तो आजच्या रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह आला आहे.
आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय माहिती:
जावळी:- बेलावडे येथील 2 पुरुष व 2 महिला. निपाणी येथील 1 पुरुष व 1 महिला. काटवली येथील 1 पुरुष. गवडी येथील 1 महिला. रांजणी येथील 1 महिला.
सातारा:- वावदरे येथील 1 पुरुष. खडगाव येथील 1 महिला. कुसवडे येथील 1 पुरुष.
खटाव:- बनपूरी येथील 4 पुरुष व 1 महिला. वांझोली येथील 2 पुरुष व 3 महिला. पाचवड येथील 1 पुरुष.
कोरेगांव:- कटापूर येथील 1 पुरुष. शिरंबे येथील 1 पुरुष.
कराड:- खराडे येथील 1 पुरुष 2 महिला.
पाटण:- तामिणे येथील 2 पुरुष.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
PuneriSpeaks is now on Telegram. Click here to join our channel and stay updated with the latest Biz news and updates.