सातारा: लॉकडाउन वाढवल्याने व्यापाऱ्यांच्यात नाराजीचा सूर

0
सातारा: लॉकडाउन वाढवल्याने व्यापाऱ्यांच्यात नाराजीचा सूर
Spread the love

सातारा लॉकडाउन वाढवण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी घोषणा केल्यानंतर अनेक व्यापारी वर्गामध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात 27 ते 31 जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. अजून 5 दिवस लॉकडाउन वाढल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अनेकांनी जिल्हा माहिती कार्यालय, सातारा यांच्या अधिकृत फेसबुक पेज वर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“जे छोटे व्यवसायिक आहे…त्याना तर कोण वालीच नाय राहिला.. दुकानचं भाडं,लाईटबील,बॅंकेचे हप्तेआंणि त्यात Lockdown…सरकारनी थोडा तरी विचार करावा…”

Jivan Choramale

सरकार घर खर्चाचे पैसे देणार असले ना तर अजून एक 25 वर्षं पर्यंत लोकडोवन करा आणि मग सगळे मस्त राहितल काय लावले आहे हे जगावे का मारावे ..आणि सरकार ब
ने प्रत्येक च्या घरी दगड पाठवा ते खातो आणि जगतो…आधी एक नोकरी नाय आणि वर ही लोकडोवन ची नाटक कसे करावे…

पुष्कर साळवी

पहिला आदेश डिलिट केला. अरे लाज आहे का प्रशासन आणि नेते मंडळी ना 4 महिना पासून धंदा बंद आहे. भिक मागायची वेळ आली आहे. तुम्हाला काय गंम त वाटती आहे का? अक्कल नाही

धनंजय कुलकर्णी

मेडिकल, दुध,किराणा ह्या दुकानात गेल्यावर कोरोना होत नाही का?साहेब कोरोना ची साळखी तोडण्यासाठी आम्हीही गेली चार महिने घरी बसून आहे. हे असेच चालू रहिले तर माझा सारख्या असंख्य सामान्य लोकांना हे लॅाकडाऊन परवडणारे नाही. सामान्य माणसाकडे सगळ्या गोष्टी बरोबर लढण्याची ताकद असते पण आर्थिक गोष्टी पुढे गुडघे टेकावेच लागते साहेब. एक काम करा लॅाकडाउन अजून कडक करा पण सामान्य माणसाच्या खात्यावर सरकारला पैसे टाकायला सांगा. एक तर तुम्ही जगून सुद्धा देत नाही आणि मरुन सुद्धा देत नाही.मि एक दुकानदार आहे मला साधे चार महिन्याचे भाडे माफ झाले नाही. का कर्जाचे हप्ते कोन भरणार आहे सरकार? मि घेतलं म्हणजे मालच भरावे लागणार आहे आणि त्यासाठी मला काम करावे लागणार. विनंती लॅाकडाउन उठवा साहेब.😡 😒

सचिन चव्हाण

सलग 3 महिने लोकडोवन चा आदेश काढा.म्हणजे सर्व सुव्यवस्थित होऊन.सर्वसामान्य लोकं ,व्यापारी लोकं उपाशी मरतील.

संतोष जगताप

अशा अनेक लोकांनी आपली नाराजी “जिल्हा माहिती कार्यालय, सातारा” यांच्या फेसबुक पेज वर उघड केली आहे. आपण सुद्धा या पेज ला भेट देऊन आपले मत मांडू शकता.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on Telegram. Click here to join our channel and stay updated with the latest Biz news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.