Satara News : काळज मधील अपहरण केलेल्या बालकाचा मृतदेह सापडला

0
Satara News : काळज मधील अपहरण केलेल्या बालकाचा मृतदेह सापडला
Share

Satara News काळज, फलटण : दोन दिवसांपूर्वी काळज मधील दहा महिन्याच्या बालकाचे फोटो सर्व सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले होते. या बाळाचे अज्ञात स्त्री व पुरुषाने अपहरण केल्याची घटना घडल्याचे फोटो सर्वत्र पसरले होते. सातारा पोलिस बालकाचा शोध घेत असताना आज सकाळी (१ ऑक्टोबर) ला बालकाचा घराशेजारील विहिरीतच मृतदेह मिळाला आहे. हे प्रकरण नक्की अपहरण चे आहे की घातपात यावर पोलीस तपास करत आहेत

मंगळवारी काळज, ता. फलटण येथून गुलाबी साडी घातलेल्या स्त्री व 20-22 वर्षीय पुरुषाने दुचाकीवरून दहा महिन्याच्या बालकाचे अपहरण केले होते. कुटूंबियांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अज्ञात स्त्री व पुरुषावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांचा तपास सुरु असताना आज सकाळी त्या अपहरण झालेल्या बालकाचा मृतदेह घराशेजारील विहिरीत सापडला आणि परिसरात एकच खळबळ उडाली. ओम आदिक भगत असं या चिमुकल्याचे नाव आहे. घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीमध्ये या चिमुकल्याचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन हा मृतदेह बाहेर काढला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

पोलिस याबाबत सखोल तपास करत आहेत. दरम्यान, त्या बालकाचा मृतदेह घराशेजारील विहिरीत सापडल्याने साताऱ्यात संतापाची लाट उसळली आहे. घटनेचा तपास लोणंद पोलीस ठाणे करत असून नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. याबाबत अजून कोणाला माहिती असल्यास पोलिसांनी त्यांना समोर येण्यास सांगितले आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.