सविता भाभी…तू इथंच थांब पोस्टर मुळे पुण्यात पुन्हा चर्चेला उधाण

0
सविता भाभी…तू इथंच थांब पोस्टर मुळे पुण्यात पुन्हा चर्चेला उधाण

” सविता भाभी…तू इथंच थांब” (Savita Bhabhi Posters in Pune) अशा आशयाचे पोस्टर सध्या पुण्यात झळकले आहेत.

यावरून काही महिन्यांपूर्वी ‘शिवडे, आय एम सॉरी’ या पोस्टरबाजीची पुणेकरांना आठवण झाली. या पोस्टर मधील सविता भाभी कोण याचे कुतुहुल लोकांना आहे.

शिक्षणाचं माहेरघर आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणारे पुणे आता Savita Bhabhi Posters नी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विशिष्ट प्रकारच्या पाट्या यासाठी आधीच पुणे प्रसिद्ध आहे. या पाट्यांची जागा आता पोस्टर ने घेतल्याची चर्चा होत आहे. ‘शिवडे आय एम सॉरी’ तसेच काही वर्षांपूर्वी ‘दादा,एक गुड न्यूज आहे’ असे पोस्टर पुण्यात झळकले होते. या दोन्हीही पोस्टरमुळेही चांगलाच गदारोळ उडाला होता. अभिनेत्री प्रिया बापट ने ‘दादा,एक गुड न्यूज आहे’ हे नाटकाचं पोस्टर असल्याचं जाहीर केलं. तर ‘शिवडे आय एम सॉरी’ हे पोस्टर पुण्यातील एका प्रेमीने लावल्याचे स्पष्ट झाले होते.

Dada me pregnant aahe Posters in pune
दादा, मी प्रेग्नंट आहे पोस्टर्स

Savita Bhabhi Posters कोणी लावले?

पुण्यातील म्हात्रे पुलासह अनेक भागामध्ये ‘सविता भाभी, तू इथंच थांब’ अशी पोस्टरबाजी करण्यात आली आहे. अखेर सविताभाभीचं गुढ उलगडलं आहे. ही “अश्लील उद्योग मित्र मंडळ” या नव्या चित्रपटाची जाहिरात असल्याची माहिती समोर आलेले आहे. ही पोस्टरबाजी त्यांच्या आगामी सिनेमाची असल्याचे उघड झाले आहे. याशिवाय सई ताम्हणकर चा एक व्हिडिओही व्हायरल झाला असून सविता चा आवाज आहे.

यामध्ये सई ताम्हणकर स्वत:ला सविता असल्याचं म्हणतं आहे. 6 मार्च 2020 मध्ये या सिनेमाचे ट्रेलर लॉन्च होणार आहे. “अश्लील उद्योग मित्र मंडळ” हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता अमेय वाघ मुख्य भूमिकेत काम करत आहेत.

कशी वाटली प्रोमोशन ची कल्पना?

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.