सावित्रीबाई फुले Savitribai Phule Information in Marathi
भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या जननी, शिक्षणक्रांती ज्योती त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन…!!

सावित्रीबाई फुले
जन्म: ३ जानेवारी १८३१, नायगाव,तालूका खंडाळा, सातारा
ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते, शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि पारतंत्र्यात ठेवले जात होते त्या काळात सावित्रीबाईचा जन्म झाला. पुढे मात्र सावित्रीबाईना ज्योतिबा फुले यांचा उदार दृष्टीकोन असल्याने स्वतःचे व्यक्तिमत्व घडविण्याची संधी प्राप्त झाली.
मृत्यू: १० मार्च १८९७, पुणे
सावित्रीबाई फुले या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. १८४० साली जोतिराव फुल्यांशी सावित्रीबाईं चा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईं चे वय नऊ, तर जोतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते.
सावित्रीबाईं ना ख्रिश्चन मिशनर्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईं ना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.
१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईं नी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. १ जानेवारी, १८४८ रोजी भिडेवाड्यात जोतिराव आणि सावित्रीबाईं नी मुलींची शाळा काढली. सगुणाऊं ना त्या शाळेत बोलाविण्यात आले.
सावित्रीबाईं च्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी “धर्म बुडाला…. जग बुडणार…. कली आला….” असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी नंतर दोन शाळा काढल्या. त्या व्यवस्थित चालल्या. पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १९५२ मध्ये इंग्रज सरकारने फुले पतीपत्नीचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही जाहीर केले. भारतातल्या मुलीना पहिल्या शाळेतील या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले.

केशवपन बंद करण्यासाठी व पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईं नी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईं चा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.
सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या. १० मार्च १८९७ ला पुण्यात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. परंतु त्यांच्या या कार्याची पोचपावती सध्या बघायला मिळतेय. आजकाल स्त्रिया मोठमोठ्या स्तरावर विराजमान झालेल्या आपल्याला बघायला मिळतात त्यात सावित्रीबाई फुले यांचे मोलाचे योगदान आहे.
दलितांना मायेने जवळ करणाऱ्या, स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून धडपडणाऱ्या सावित्रीबाई खर्या अर्थाने ज्योतीबांच्या सहचरणी म्हणून शोभल्या. त्याच्या थोर सामजिक कार्याची कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाई चा जन्मदिन हा “बालिका दिन” म्हणून साजरा केला जातो.
आजकालची पिढी सावित्रीबाई चे योगदान विसरत चालली असून शिक्षणाचा गुरुमंत्र देणाऱ्या सावित्रीबाई च्या कार्याचा प्रसार आणि प्रचार करूयात….
हा लेख आवडल्यास Whatsapp, Facebook, Twitter वर नक्की शेअर करा.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे दीर्घ आजाराने निधन
Nice information yarr
Jay hind jay Maharashtra
Nice