दशक्रिया चित्रपटाविरोधात असा लढला ब्राह्मण जागृती सेवासंघ (पिंपरी-चिंचवड शहर)

0
दशक्रिया चित्रपटाविरोधात असा लढला ब्राह्मण जागृती सेवासंघ (पिंपरी-चिंचवड शहर)

‘दशक्रिया’ या मराठी चित्रपटातील ब्राह्मण समाजाचा तसेच हिंदू धर्म संस्कृतीचा अपमान करणारे काही संवाद आहेत ते काढून टाकावेत या मागणीसाठी ब्राह्मण जागृती सेवा संघ (पिंपरी-चिंचवड शहर) तर्फे ‘पिंपरी’ येथे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या चित्रपटाच्या निषेधार्थ घोषणा देऊन निषेध व्यक्त करून आंदोलन करण्यात आले.
चित्रपटात अत्यंत घाणेरडया शब्दांत ब्राह्मण समाजाची व पुरोहित वर्गाची बदनामी केली आहे आणि दलाल हा शब्दप्रयोग वापरला आहे याबाबत भाजपा चित्रपट कामगार आघाडीला संघटनेकडून याबाबत निवेदन देखील देण्यात आले.

ब्राह्मण समाजाच्या विरोधाचा दणका…

ब्राह्मण समाजाच्या व पुरोहित वर्गाच्या भावना दुखावणार संवाद यासाठी तणावपूर्ण वातावरणात काही ठिकाणी प्रदर्शित झालेला दशक्रिया हा मराठी चित्रपट अखेर बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे आदळला आणि ब्राह्मण समाजाच्या आक्रमक भूमिकेला यश मिळाले…

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात ब्राह्मण जागृती सेवा संघाने दशक्रिया चित्रपट विरोधी भूमिका घेऊन ठीकठिकाणी निषेध, निदर्शने, आंदोलन या वेगवेगळया माध्यमातून जो विरोध दर्शवला त्याला अखेर यश मिळाले. संपूर्ण महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाच्या निरनिराळया संघटनेकडून झालेल्या या विरोधामुळं दशक्रिया हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे आदळला.

यावेळी संघटनेचे शहरअध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांनी हिंदू धर्मातील या विधींना थोतांड कसे काय म्हणता येइल असा सवाल करत पुण्यात देखील आंदोलन करणार असून यापुढे असे समाजाला बदनाम करणारे चित्रपट तयार होत असतील तर ब्राह्मण समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असे प्रसिद्धिमाध्यमांसमोर सांगितले.


हा समाज कलाकारांचा आदर्श घेतो त्यामुळे जात धर्माच्या पलिकडे जाऊन आदर्श घेण्यात येउ शकतील अशा चित्रपटांत कलाकारांनी काम करावयास हवे अशी भावना राजन लोणकर यानी व्यक्त केली.
या आंदोलनात तपन इनामदार,राजन लोणकर, अखिलेश कुलकर्णी, सुषमा वैद्य, रुशिकेश राजहंस यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी या चित्रपटाच्या निषेधाच्या घोषणा देत संताप व्यक्त केला.

दशक्रिया चित्रपटाविरोधात असा लढला ब्राह्मण जागृती सेवासंघ (पिंपरीचिंचवड शहर)

दिनांक १४ नोव्हेंबर महाराष्ट चित्रपट आघाडीला निवेदन

दिनांक १५ नोव्हेंबर पिंपरी येथे निषेध आंदोलन.

दिनांक १६ नोव्हेंबर शहरातील प्रत्येक चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित न करण्याबाबत पत्र देण्यात आले.

परिणाम

दिनांक १७ नोव्हेंबर शहरात सर्व चित्रपटगृतील प्रदर्शन तात्काळ रद्द आणि पूर्ण शहरात सुरुवातीच्या महत्वाच्या २ दिवसात फक्त २ खेळ झाले.

अशा पद्धतीने शांत समजल्या जाणाऱ्या ब्राह्मण समाजाने चित्रपट बंद पाडून दाखवला असे मत व्यक्त केले. याच धर्तीवर पद्मावती सिनेमा येत आहे, यावर राजपूत समाज खूप विरोध करत असताना तोही सिनेमा पुढे ढकलण्यात आला आहे. सिनेमाला होणाऱ्या विरोधाबाबत आपणही आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये लिहाव्यात..

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.