पुण्यातील सेंटियंट लॅबने हायड्रोजन बस तयार केली आहे. फक्त ३० किलो हायड्रोजनमध्ये ४५० किमीचा पल्ला पार करणारी ‘मेड इन इंडिया’ बस एकावेळी ३२ लोकांना घेऊन जाऊ शकते.

हा भारतातील पहिला स्वदेशी विकसित पायलट प्रोजेक्ट असून भारतातील पहिली उत्पादित बस आहे जी हायड्रोजन इंधन सेलवर चालेल. ३२ आसन क्षमता असलेल्या बसमध्ये वातानुकूलित यंत्रणा सारख्या सुविधा देखील आहेत.
सेंटियंट लॅब हायड्रोजन बस
हायड्रोजन इंधन सेल बस वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR), राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आणि सेंट्रल इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने सेंटियंट लॅबद्वारे डिझाइन आणि विकसित केली गेली आहे. वीज निर्मितीसाठी बस हायड्रोजन इंधन आणि हवा वापरते. बसमधून फक्त पाणी उत्सर्जन होते, त्यामुळे ते वाहतुकीचे सर्वात पर्यावरण-अनुकूल साधन बनते. उदाहरणार्थ, एक सामान्य डिझेल बस दरवर्षी १०० टन कार्बन डायऑक्साइड (CO2) उत्सर्जित करते. या बसमुळे CO2 उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार आहे.

हायड्रोजन बस बाजारपेठांमध्ये कधी येणार
सेंटियंट लॅब्स भारतीय ऑटोमोटिव्ह OEM सोबत मोठ्या प्रमाणावर हायड्रोजन फ्युएल सेल बसेसचा अवलंब करण्यासाठी चर्चा करत आहेत. लवकरच या बसेस बाजारात धावतील यात शंका नाही.
©PuneriSpeaks
© PuneriSpeaks