सिरो सर्व्हे: पुण्यातील ५१.५ % लोकांना होऊन गेला कोरोना, समजलेच नाही!

0
सिरो सर्व्हे: पुण्यातील ५१.५ % लोकांना होऊन गेला कोरोना, समजलेच नाही!
Spread the love

सिरो सर्व्हे: पुण्यात सर्वात जास्त कोरोना रुग्ण सापडलेल्या प्रभागामधील सुमारे ५१.५ टक्के नागरिकांना कोरोना होऊन गेला असण्याची शक्यता आहे. पुण्यातील IISER आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेल्या सिरो सर्व्हे मधून ही बाब समोर आलेली आहे.

पुण्यामधील येरवडा, कसबा पेठ, रास्ता पेठ, कासेवाडी आणि पर्वती येथील भागांत हा सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हे मध्ये एकूण १६६४ रक्त चाचण्या करण्यात आल्या आणि त्यापैकी ५१.५ टक्के लोकांच्या शरीरात अँटिबॉडीज तयार झालेल्या आढळून आल्या आहेत. पुण्यातील 5 प्रभागांमध्ये 20 जुलै ते 5 ऑगस्टपर्यंत हे सर्वेक्षण करण्यात आले होते.

  • येरवडा चाचणी- ३६७, अँटिबॉडीज- ५६.६ %
  • कसबा सोमवार पेठ चाचणी- ३५२, अँटिबॉडीज- ३६.१ %
  • रास्ता पेठ रविवार पेठ चाचणी- ३३५, अँटिबॉडीज- ४५.७ %
  • लोहियानागर कासेवाडी चाचणी- ३१२ अँटिबॉडीज- ६५.७ %
  • नवी पेठ पर्वती चाचणी- २९८, अँटिबॉडीज- ५६.७ %
Sero Survey Pune Results
© लोकमत

सिरो सर्व्हे अहवालानुसार,  स्वतंत्र शौचालय असणाऱ्या घरांमध्ये 45.3%, सामायिक शौचालय वापरणाऱ्यां मध्ये 62.2%, बंगल्यामध्ये राहणाऱ्यांमध्ये 43.9%, चाळी किंवा झोपडपट्टीत राहणाऱ्यांमध्ये अनुक्रमे 56% आणि 62% तर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्यांमध्ये  33% प्रमाण आढळून आलं आहे.

एकूण घेतलेल्या १६६४ नमुण्यांपैकी ५१.५ टक्के बाधित कोरोना होऊन गेला असण्याची शक्यता आहे.

काय आहे सिरो सर्व्हे

सिरो सर्वेक्षण मध्ये कोरोना व्हायरस चे एखाद्या व्यक्तीला संक्रमण झाले आहे की नाही हे ठरवण्यासाठी रक्ताचे नमुने गोळा केले जातात. पूर्वी त्या व्यक्तीला या विषाणूचा संसर्ग झाला होता की नाही हे शोधण्यासाठी आणि कोविड -१९ चा सामना करण्यासाठी किती अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत याची तपासणी केली जाते.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.