Serum Institute तीन महिन्यात बनवणार 10 लाखांच्या वर कोरोना लस: सीईओ अदार पूनावाला

0
Serum Institute तीन महिन्यात बनवणार 10 लाखांच्या वर  कोरोना लस: सीईओ अदार पूनावाला
Share

Serum Institute सर्वाधिक लस उत्पादक मध्ये जगात प्रथम क्रमांकावर आहे. अनेक प्रकारच्या लस उत्पादन मध्ये Serum Institute आघाडीवर असून भारताबरोबर जगातील लोकांना लागणाऱ्या अनेक लसींची निर्मिती येथेच होते.

जगातील सर्वात मोठी लस उत्पादक Serum Institute of Ind Pvt Ltd. ने अ‍ॅस्ट्रॅजेनेका बरोबर भागीदारी केली आहे. तसेच स्वतःहून विकसित केलेल्या न्युमोकोकल लस साठी डीसीजीआय कडून हिरवा कंदील मिळाला आहे. सीरम संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पूनावाला यांनी त्यांच्या कंपनीच्या पुढील योजना इंडियन एक्सप्रेस बरोबर बोलताना सांगितल्या.

कोविड-19 विरूद्ध लस उपलब्ध होण्यासाठी किती वेळ लागेल?

प्रत्येकाला लस घेण्यासाठी बराच काळ जाईल कारण किती लोकांना डोस द्यावे लागतील याची संख्या खूप आहे. जगातील सर्व भागात डोस बनवण्यासाठी आव्हानांचा सामना केला जात आहे. याचा अर्थ असा नाही की जगासमोर सर्वप्रथम आलेली लस ही सर्वात चांगली असेल. कोविड -19 लस बनवण्यासाठी अनेक वैज्ञानिक दृष्टिकोन विचारात घेतले जात आहेत. सर्वात उत्तम लस कोणती आहे ते पहावे लागेल.

ऑक्सफोर्ड विद्यापीठाने कोविड -19 लस बनवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना समर्थन देण्यासाठी Serum Institute ने ब्रिटीश औषध निर्माता अ‍ॅस्ट्रॅजेनेका बरोबर भागीदारी केली आहे. क्लिनिकल चाचण्यांचे निकाल किती आशादायक आहेत आणि सीरम इन्स्टिट्यूटची काय योजना आहे?

अग्रगण्य लस बनवणार्या पैकी अ‍ॅस्ट्रॅजेनेका एक उत्पादक आहे, ज्यासाठी सीरमने शेकडो कोट्यावधी डॉलर्स खर्च केले आहेत. आम्ही अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसीवर विश्वास ठेवत नसतो तर आम्ही ते केले नसते. अ‍ॅस्ट्रॅजेनेका उत्पादनासंदर्भात, दोन ते तीन दिवसांत एक घोषणा केली जाईल. आम्ही त्यासाठी थांबलो आहोत आणि नंतर त्यांनी घेतलेल्या टप्प्यावरील चाचण्यांवर निष्कर्ष आल्यानंतर भाष्य करणे योग्य राहील. आम्ही आत्तापर्यंत उत्पादन केलेल्या लसींवर वर भाष्य करू शकत नाही, परंतु उत्पादन परवाना मिळाल्यानंतर पुढील तीन महिन्यांत लाखो डोस तयार करण्याची आमची योजना आहे. आम्ही लस तयार करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.