काश्मीर: संपूर्ण जग सध्या कोरोनाशी सामना करत असताना पाकिस्तान चा पूर्व क्रिकेटपटू शहीद आफ्रिदी पाक व्याप्त काश्मीर ला जाऊन तेथील लोकांना भडकवण्यात व्यस्थ आहे. नुकताच त्याने पाक व्याप्त काश्मीर (POK) चा दौरा केला. तिथे जाऊन मोदी विरुद्ध वक्तव्य केले. आफ्रिदी पाकिस्तानी सैनिक किती आहेत हे बोलताना अडखळला त्याचा भारतातील सोशल मिडीयावर खूप ट्रोल झाला. गौतम गंभीर याने सुद्धा त्याला टोला लगावला. अशातच अजून एक वक्तव्य करून तो पुन्हा भारतीयांना खिजवत आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या मनात काश्मीरबद्दल कोरोना व्हायरसपेक्षा ही अधिक विष आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलताना तो म्हणाला होता. या वक्तव्यावर भारतातून संताप व्यक्त केला.
शहीद आफ्रिदी म्हणाला, मी आता असलेल्या परिस्थितीचा योग्य उपयोग करेन आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला विनंती करेन की पुढच्या वर्षीच्या पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत एक संघ वाढवण्यात यावा. काश्मीर नावाच्या संघाला स्पर्धेत समाविष्ट करून घेण्यात यावे आणि माझ्याच्या शेवटच्या वर्षात मला काश्मीर संघाचे नेतृत्व करायला मिळावं.
दरम्यान, मला इथे येऊन क्रिकेटचे सामने पाहायला नक्कीच आवडेल. स्पर्धेतील चांगल्या खेळाडूंना मी माझ्यासोबत कराचीला घेऊन जाईन आणि अधिकचं प्रशिक्षण देईन, असं आफ्रिदी म्हणाला आहे.