थोरले शाहु महाराज इतिहास: संभाजीपुत्र थोरले शाहु महाराज यांचा अलौकिक इतिहास

0
थोरले शाहु महाराज इतिहास: संभाजीपुत्र थोरले शाहु महाराज यांचा अलौकिक इतिहास

छत्रपती थोरले शाहु महाराज इतिहास

१८ मे १६८२ या दिवशी रायगडावर छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसुबाईसाहेब यांना पुत्ररत्न झाले . हाच संभाजीपुत्र पुढे थोरले शाहु महाराज इतिहास मध्ये अजरामर झाले.

त्याचवेळेस लाखो सेनासागराबरोबर औरंगजेब स्वराज्यावर चालुन आला होता . संभाजीराजे मोठ्या आत्मविश्वासाने औंरजेबाशी संघर्ष करत होते . नियतीने गलती केली आणि शिवपुत्र मुघलांच्या हाती पडला.

त्यावेळी हा संभाजीपुत्र अवघा आठ वर्षाचा होता . रायगड पडल्यावर महाराणी येसुबाई व संभाजीपुत्र औरंगजेबाच्या कैदेत रहावे लागले .
तरीही राजाराम महाराजांचा नेतृत्वाखाली मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध अविरत चालुच होता .

ते स्वातंत्र्ययुद्ध तब्बल २७ वर्ष चालुन , औरंगजेबाच्या शेवटच्या श्वासाबरोबर थांबले .

दरम्यानच्या दिर्घ काळात ( १६८९ ते १७०७ ) शाहु हे मुघलांच्या कैदेतच होते . औरंगेजेबाच्या मृत्यूनंतर, तब्बल १८ वर्ष मोगलांच्या कैदेत असलेले संभाजीपुत्र शिवाजी उर्फ थोरले शाहु ह्यांची सुटका झाली. आणि खऱ्या अर्थाने शाहु महाराज इतिहास घडण्यास सुरुवात झाली

छत्रपती शाहु महाराज इतिहास

अजिंक्यतारा किल्ल्यावर शाहु १२ जानेवारी १७०८ या दिवशी छत्रपती जाहले .
पण या १८ वर्षात शाहुंना घडविणार्या मातोश्री येसुबाईसाहेब यांचे आभाळाएवढे कर्तृत्व आम्ही लक्षात घ्यायला हवे . छत्रपती शाहू महाराजांचा काळ म्हणजे मराठा साम्राज्यातील सुवर्ण काळ मानला जातो. छत्रपती शाहूंच्या मुत्सदी राजकारणाने अनेक मराठी घराणी उदयाला आली.

सामान्यातला असामान्यत्व उफाळून आलं. शाहू महाराजांनी या घराण्यातील शूर पुरुषांचा कौशल्याने उपयोग करून घेतला, त्यांच्या गुणाची कदर केली, त्यांना उत्तेजन देऊ केले, वेळोवेळी त्यांची पाठ थोपटली.

याचाच परिणाम म्हणून हे पुरुष मोठमोठी धडाडीची राजकारण स्वतःच्या ताकदीवर पेलून, शिवाजी महाराजांनी लावलेल्या स्वराज्याचा रोपट्याला, स्वतःच्या रक्तमांसाच खतपाणी घालू लागले. बघता बघता या रोपट्याचा वटवृक्ष झाला.

तो फोफावला. त्याच्या पारंब्यानी संबंध हिंदुस्थानावर आपली छाया धरली.
छत्रपती शाहूंनी अगदी विलासी आयुष्य जगले. मराठा साम्राज्याचे छत्रपती असूनही त्यांचे अगदी साधे राहणीमान होते.

छत्रपती शाहु महाराज इतिहास चित्र

छत्रपती शाहूंची आजवर अनेक चित्रे प्रसिद्ध झाली पण त्या सर्व चित्रामध्ये त्यांचे विलासी जीवन दर्शविण्यात आले आहे. झुंजार शिलेदार सेवा समिती तर्फे प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या सदर चित्रामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या राजदरबरेचे संकल्पचित्र मांडण्यात आले आहे. सदर चित्रामध्ये छत्रपती शाहू राजदरबारध्ये संपूर्ण आभूषणांसाहित दिसत आहेत. राज दरबारातील बाकी सर्व सरदारांची माहिती खालीलप्रमाणे,

छत्रपती शाहु महाराज सरदार

शाहूंच्या उजव्या हाताला

१) खंडेराव दाभाडे (सेनापती) : शाहूंच्या महान सेनेचे नेतृत्व करणारे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, खंडेराव दाभाडे. उत्तरेमध्ये गुजरात व तत्सम प्रातांमध्ये पराक्रम व वचक ठेवण्याचं काम खंडेराव दाभाडे यांनी केलं.

२) बाजीराव प्रधान : शाहू महाराजांच्या विशेष मर्जीतले. पराक्रमी व धाडसी व्यक्तिमत्व. उत्तरेतील अनेक लढायांमध्ये मर्दुमकी गाजवत मराठा साम्राज्य वाढीला मोठा हात त्यांनी लावला.

३) राणोजी शिंदे : उत्तरेतील ग्वाल्हेर व जवळील प्रांतामध्ये मराठा साम्राज्याचा विस्तार त्यांनी केला.

४) दमाजी गायकवाड : उत्तर हिंदुस्थानामध्ये पराक्रम व मर्दुमकी गाजवली. खंडेराव दाभाडे यांच्या नंतर गुजरात व राजस्थान भागामध्ये त्यांनी वचक ठेवला.

डाव्या हाताला

१) पिलाजीराव जाधवराव (मुख्य सल्लागार) :
छत्रपती शाहूंच्या प्रत्येक मोहिमेचा “मुख्य सूत्रधार”. भारतभर मराठा रियासतीच्या चालू असलेल्या हरेक मोहिमवर लक्ष ठेवण्याचे व योग्य सल्ला देण्याचे काम पिलाजीराव जाधवराव करत. छत्रपती शाहूंच्या दरबारामध्ये त्यांना विशेष स्थान होत.

२) मल्हारराव होळकर :
माळव्याचे सुभेदार म्हणून संपूर्ण हिंदुस्थानात ओळख. मराठ्यांचे साम्राज्य उत्तरेत फैलावण्यासाठी होळकरांचे मोठं योगदान आहे. उत्तरेमध्ये मल्हारबाबांचा मोठा दबदबा होता.

३) फतेसिंह भोसले :
दक्षिणेमध्ये मराठी साम्राज्याचा विस्तार भोसले घराण्याने केला. छत्रपती शाहूंच्या विशेष मर्जीतले, फतेसिंह भोसले. दक्षिणेतील भोसले घराण्याची भारताच्या सांस्कृतिक ठेव्यातल भरगोस योगदान सर्वश्रुत आहे.

४) उदाजी पवार :
धारच्या पवार घराण्यातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्व. उत्तरेतील हरेक मोहिमेमध्ये उत्स्फूर्त सहभाग व पराक्रम.

छत्रपती शाहु महाराज इतिहास झाकोळला गेला आहे तरी त्यावर एक प्रकाश टाकण्यासाठी हा लेख

माहीती साभार – चेतन घाडगे

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन ऐतिहासिक वाचण्यासाठी:

शिवाजी महाराज इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज माहिती, अफजलखान वध, शिवराज्याभिषेक, मराठा साम्राज्य, आग्र्याहून सुटका, शिवाजी महाराज वंशावळ

ज्ञानकोविंद शंभूराजे आणि छत्रपती परिवार !

संभाजी महाराज माहिती, छत्रपती संभाजी महाराज इतिहास, पराक्रम, राज्याभिषेक, मराठा साम्राज्य, संभाजी राजे महाराज विशेष

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.