मराठ्यांचं साम्राज्य असलेल्या पुण्यातील शनिवारवाड्यातही भुतांचं साम्राज्य आहे, असं म्हटलं जातं. काही स्थानिकांनी तिथे ‘काका मला वाचवा’ (Kaka Mala Vachva) अशा किंचाळ्याही ऐकल्या आहेत. या विदारक किंचाळ्यांमागचं रहस्य तुम्हाला माहितेय का?
मराठा साम्राज्याला यशोशिखरावर नेणारे पेशवा बाजीराव यांनी १७४६ मध्ये शनिवार वाडा महालाची बांधणी केली. हा वाडा पुण्यात आजही उभा आहे. सन १८१८ पर्यंत हा वाडा पेशव्यांच्या अधिकारक्षेत्रात राहीला त्यानंतर या महालाचा मोठा हिस्सा आगीत होरपळला गेला. या वाड्याचे अनेक असे रहस्य आहेत जे आजही अनुत्तरीत आहेत.
ही आग कशी लागली हेसुद्धा आजपर्यंत न उलगडलेले कोडे आहेत. पण इतकेच नाही तर येथील स्थानिक लोकांच्या मते या महलात दर अमावस्येला एक आर्त हाक ऐकू येते जी म्हणते “काका, मला वाचवा”.
हा आवाज त्या व्यक्तिचा आहे ज्याची या महलात निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर त्याचे प्रेत नदीत सोडून देण्यात आले होते.
असे म्हणतात की, पेशवा बाजीराव यांच्या मृत्यूनंतर शनिवारवाड्यात राजनैतिक अव्यवस्थेचे वातावरण होते. यामुळेच डावपेच आणि सत्तेची लालसा यामुळे १८ व्या वर्षीच नारायणराव यांची हत्या शनिवारवाड्यात करण्यात आली. असे म्हणतात की, नारायणराव आजही त्यांचे काका राघोबा यांना मदतीसाठी बोलवितांना आवाज देतात “काका, मला वाचवा”.
पेशवा नारायणराव हत्या : Kaka Mala Vachva
नारायणराव हे नानासाहेब पेशवा यांचे सर्वात लहान पुत्र होते. बाजीराव पेशवा नंतर त्यांचे थोरले पुत्र नानासाहेब पेशवा यांना गादीवर बसवले गेले. नानासाहेब पेशवा यांना तीन मुले होती. विश्वास राव , माधवराव आणि धाकटे नारायणराव. पानिपत युद्धानंतर खचलेल्या नानासाहेबांचा आजारपणामुळे मृत्यू झाला. त्यांचा मोठा मुलगा विश्वासराव पानिपत लढाईत मारला गेला होता. वंशपरंपरेमुळे नानासाहेबांची गादी त्यांच्या दुसऱ्या मुलाला म्हणजेच माधवराव यांना मिळाली. परंतु त्यांचाही २७ व्या वर्षी मृत्यू झाला. नारायणरावांच्या दोन भावांच्या मृत्यूनंतर त्यांना पेशवा बनविण्यात आले होते. नारायणराव पेशवा तर बनले पण कमी वय असल्यामुळे त्यांना रघुनाथराव म्हणजेच राघोबा यांना त्यांचा संरक्षक बनविण्यात आले आणि शासन संचालकांचा कारभारही राघोबा यांच्याच हातात होता. पण या व्यवस्थेमुळे राघोबा आणि त्यांची पत्नी आनंदीबाई फारसे खूश नव्हते. त्यांना सत्तेवर पूर्ण अधिकार हवा होता.
रघुनाथराव यांची नाराजी माधवराव यांना सुद्धा माहित होती. त्यामुळे रघुनाथराव यांना कैद करून बदामी महालात ठेवले होते. माधवरावांच्या मृत्यूनंतर रघुनाथराव यांनी डाव साधत शनिवार वाड्याचे सुरक्षारक्षक सुमेर सिंह गारदी जे भिल्लांचे सरदार होते त्यांना नारायणराव यांना ताब्यात घेण्याचा हुकुम दिला. पण या पत्रातला मजकूर आनंदीबाईनी बदलून ” नारायण रावांस धरावे” ऐवजी ” नारायण रावांस मारावे” असा केला. मराठीतील “ध चा मा करणे” ही म्हण याच प्रसंगावरुन प्रचलित झाली. सुमेर सिंग गारदी आणि नारायणराव यांचे संबंध चांगले नव्हते, त्यामुळे सुमेर सिंहने नारायण राववर हल्ला केला.
नारायणराव ‘काका मला वाचवा‘ (Kaka Mala Vachva) असे ओरडत शनिवारवाड्यात पळत होते आणि ते त्यांचे अखेरचे शब्द ठरले. गारदी ने तलवारीने वार करत नारायणरावचे प्राण घेतले.
असे म्हणतात की, आजही नारायणराव यांचा आत्मा शनिवारवाड्यात आहे आणि मदतीसाठी “काका मला वाचवा” (Kaka Mala Vachva) हाक देत आहे. त्यामुळे सायंकाळी शनिवारवाडा बंद केला जातो. रात्री शनिवार वाड्यात प्रवेश दिला जात नाही.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील १० विशेष गुण…