माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने अजित पवार अस्वस्थ, शेती, उद्योग करावा म्हणतोय: शरद पवार

0
माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने अजित पवार अस्वस्थ, शेती, उद्योग करावा म्हणतोय: शरद पवार

मुंबई: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

यावर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्याचे कारण स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. यावर अजित पवार यांनी मात्र काहीही प्रतिक्रिया दिली नाही.

शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती:
अजित च्या राजीनाम्याचे कारण मला पण जाणून घ्यायचे आहे.
राजीनामा देण्याबाबत आमची कोणताही बातचीत झाली नव्हती. त्याच्या मुलाकडून काही बाबी कळल्या. त्यावरून शरद पवार यांनी राजीनामा नाट्यावर माहिती दिली

सहकारी संस्थेत अजित काम करत असताना काही कारणांनी सहकारी संस्था अडचणीत आल्या. यामध्ये नावासह माझंही नाव घेतलं गेलं. माझ्यामुळे काकांना त्रास होतोय, राजकारणाची पातळी घसरली घसरत चालली असल्याचे अजित ला वाटत आहे.

राजकारण सोडून शेती अथवा उद्योग करावा असे त्याला वाटत आहे.आपल्या मुलांना सुद्धा शेती अथवा उद्योग करा असे त्याने सांगितले आहे. कुटुंबप्रमुख म्हणून मी अजित शी बोलणार असल्याचे शरद पवार हे म्हणाले.

दिवसभर ED प्रकरण गाजत असतानाच विधानसभेची मुदत संपायला थोडाच अवधी असताना अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे खळबळ उडाली आहे.

रात्री उशिरापर्यंत अजित पवार यांच्याशी संपर्क होत नव्हता परंतु रात्री ते अहमदनगर जिल्ह्यातील त्यांच्या अंबालिका शुगर्स कारखान्यावर दाखल झाले आहेत.
आपल्याला याबद्दल काय वाटते आम्हाला नक्की कळवा.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

शिवाजीनगर बस स्थानक मधील MSRTC बस आता मुळा रोड वरून सुटणार

CIBIL SCORE काय असतो?

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.