नीरव मोदी सारख्या कर्जबुडव्यांमुळे युवकांना कर्ज मिळणे कठीण: शरद पवार
‘न खाऊंगा न खाने दुंगा’ अशी हाक देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांची मने जिंकली होती. पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक करून नीरव मोदी हा १२ हजार कोटी रुपये घेऊन फरार झाला परंतु या मोदीला पकडण्यासाठी पंतप्रधान मोदींकडे कोणतीही योजना नाही, अशी टीका शरद पवार यांनी हल्लाबोल आंदोलनाच्या सभेत बोलताना केली.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून आझाद मैदानात हल्लाबोल आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. मोठी लोकं कर्ज घेऊन फरार होतात त्यामुळे युवकांना कर्ज मिळण्यास त्रास होत असल्याचे पवार बोलले. सर्वांनी एकत्र येत लढा पुकारण्याचे आवाहन त्यांनी या सभेत बोलताना दिले.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
SUCCESS STORY OF PRALHAD P CHHABRIA, FINOLEX INDUSTRIES