मी असल्यावर सगळे सरळ होते. माझ्या पुढे सर्वांच्या कॉलर खाली येतात. निवडणुका लागल्या की उडविलेली कॉलर सरळ होते, असा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांना लगावला. विशेष म्हणजे हे सांगताना पवारांनी स्वतः कॉलर उडवली हे विशेष.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत असताना पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सातारच्या राजकारणावर भाष्य केले. या परिषदेत पवारांनी उदयनराजेंपासून ते राहुल गांधींपर्यंत सर्वच विषयांवर आपल्या भाषेत उत्तरे देत आपली बाजु मांडली.
“माझ्यापुढे सर्वांच्या काॅलर खाली येतात”
साताऱ्यात उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांमध्ये पेच निर्माण झाला आहे त्यावर एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना पवार म्हणाले. “पेच वगैरे काही नाही, हा समज आहे. या पेचावर उतारा काढण्याची वेळच येणार नाही. मी असलो की सगळे सरळ होतात. माझ्या पुढे सर्वांच्या कॉलर खाली येतात असा टोला लगावत पवारांनी स्वतः कॉलर उडवून दाखवली.
पवारांनी ‘कॉलर’ उडविल्यानंतर उदयनराजेंची फडणवीसांना भेट
खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात राजधानी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाचे निमंत्रण आज त्यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दिले. तसेच आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, अशी आशा व्यक्त केली.
या भेटीने सातारच्या राजकारणात हालचाल व्हायला सुरुवात झाली असेल हर नक्की, उदयनराजे भोसले आणि फडणवीस यांच्या भेटीमुळे चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
Sharad Pawar Wiki & Net Worth: Age, Biography, Wife, Family, Political Back Ground Details