‘शरद पवार 2019 ला देशाचे पंतप्रधान होऊ शकतात’

0
‘शरद पवार 2019 ला देशाचे पंतप्रधान होऊ शकतात’

‘2019 राष्ट्रवादी आणि आपल्या साहेबांचे वर्ष राहील. सध्या राजकारण ज्या दिशेने बदलत आहे त्यात आमच्या मनात पवार साहेबांच्याबद्दल जी इच्छा आहे ती गोष्ट अशक्य नाही. ते घडू शकतं.’ असंही यावेळी पटेल म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीत बोलताना प्रफुल्ल पटेलांनी शरद पवार 2019 ला पंतप्रधान होऊ शकतात असा विश्वास व्यक्त केला. पण त्यासाठी जोमानं कामाला लागण्याची गरज असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितंल.

‘पवार साहेब  खूप  सॉफ्ट राहतात त्यांनी ते  सोडून द्यावे’

दरम्यान, यावेळी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांनी देखील काही सल्ले दिले. ‘पवार साहेब तुम्ही सॉफ्ट राहणं सोडून द्या. राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जे बदनाम करत आहेत त्यांच्याबद्दल पवार साहेब तुम्ही खूप सॉफ्ट राहता.’ असं म्हणत पटेल यांनी पवारांनी आक्रमक भूमिका घ्यावी असंही सुचवलं.

‘…तर भाजप शिवसेनेला का सोडत नाही?’

याचवेळी प्रफुल्ल पटेल यांनी भाजपवर देखील टीका केली. ‘दररोज सामनामधून टीका होते तर भाजप ही टीका का सहन करते? हिंमत असेल तर शिवसेनेला का सोडत नाही, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

 

‘काँग्रेसबरोबर आपलं शत्रुत्व नाही’

‘देशाच्या राजकारणात जे वातावरण तयार झालेलं आहे ते पाहता आपल्याला खुल्या मनाने काम करावं लागेल. काँग्रेसबरोबर आपलं शत्रुत्व नाही सध्या हे संबंध ‘कभी खुशी, कभी गम’ आहेत. 2014 निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढली असती तर 125 ते 140 जागांवर विजय मिळाला असता. विधान सभा-लोकसभा निवडणूक एकत्र येऊ शकतात,पक्षाचा ठोस कार्यक्रम ठरला पाहिजे आणि त्यावर काम केलं पाहिजे. असं शरद पवार यांना वाटतं.’ असं म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी 2019च्या निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसनं आतापासून आघाडीचे संकेत दिले असले तरी आता ऐनवेळी काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

News Source

Also Read:  Sharad Pawar Wiki & Net Worth: Age, Biography, Wife, Family, Political Back Ground Details

 

Also Read: शरद पवार यांच्या कारकिर्दीचा आढावा…..?

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.