शार्क टँक परीक्षक वार्षिक उत्पन्न, Shark Tank India Judge Net Worth

0
शार्क टँक परीक्षक वार्षिक उत्पन्न, Shark Tank India Judge Net Worth

शार्क टँक (Shark Tank India) हा सध्या जोरदार चर्चेत असणाऱ्या रिअॅलिटी शो पैकी एक आहे. नवोदित उद्योजकांना पैसा मिळवून देण्यासाठी या मालिकेची सुरुवात करण्यात आली आहे.

मालिकेत येणारे नवोदित उद्योजक कंपनीतील ठराविक टक्के इक्विटीच्या बदल्यात शार्ककडून (गुंतवणूकदार) गुंतवणूक मागतात. शार्क कंपनीचे मूल्यांकन करून कंपनीत गुंतवणूक करण्याबद्दल निर्णय घेतात. यामुळे नवोदित उद्योजकांना यामुळे आपला उद्योग वाढवण्यासाठी भांडवल मिळून सोनी सारख्या दूरध्वनीवरून प्रसार होऊन प्रसिध्दी देखील मिळत आहे.

शार्क टँक परीक्षक हे सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर असून त्यांची गुंतवणूक करण्याची पद्धत शैली लोकांना आकर्षित करत आहे. सध्या ही मालिका TRP मध्ये उंच शिखरावर आहे. शार्क टँक रिअॅलिटी शो २० डिसेंबर २०२१ पासून सोनी टीव्हीवर प्रसारित झाला आहे

चला शार्क टँक परीक्षक वार्षिक उत्पन्न आणि त्यांच्याबद्दल थोडे जाणून घेऊयात. Shark Tank India Judge Net Worth

1. अमन गुप्ता | कंपनी – BoAt

Aman Gupta Shark Tank Net Worth
Aman Gupta Shark Tank

अमन गुप्ता हे तरुण उद्योजकांपैकी एक आहेत जे सोनी टीव्ही वरील शार्क टँक मालिकेतील प्रसिद्ध चेहरा आहेत. आपल्या नाविन्यपूर्ण भाषा शैलीच्या जोरावर ते मालिकेतील सर्वात आवडते जज आहेत हे म्हणायला हरकत नसावी.

केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून पदवी प्राप्त केलेले, अमन गुप्ता हे स्वयंनिर्मित उद्योजक आहेत, ते boAt चे सह-संस्थापक आहेत. BoAt ही कंपनी इअरफोन्स आणि हेडफोन्सचा व्यापार करते. समीर मेहता आणि अमन गुप्ता यांनी मिळून जानेवारी २०१६ मध्ये BoAt ची सह-स्थापना केली.

अमन गुप्ता यांनी FREECULTR, Bummer, Skippi Ice Pops, Shiprocket, WickedGud, Anveshan आणि 10club यासह अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. BoAt चे सह-संस्थापक अमन गुप्ता यांची एकूण संपत्ती अंदाजे 700 कोटी च्या घरात आहे.

2. अश्नीर ग्रोव्हर | सह-संस्थापक – BharatPe

ashneer grover shark tank india net worth
Ashneer Grover Shark Tank India

IIT दिल्ली आणि IIM अहमदाबादचे माजी विद्यार्थी असलेले अश्नीर ग्रोव्हर हे BharatPe चे सह-संस्थापक आणि MD आहेत. त्यांनी शाश्वत नाकराणी सोबत २०१८ मध्ये डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म BharatPe ची सह-स्थापना केली होती. सध्या कंपनी १५० शहरांमध्ये ७५ लाखांहून अधिक व्यापाऱ्यांना सेवा प्रदान करत आहे.

तो सध्या शार्क टँक इंडिया च्या न्यायाधीशांपैकी एक आहेत.

२०१८ मध्ये BharatPe सह-संस्थापक होण्यापूर्वी, ग्रोव्हर हे PC Jeweller येथे एका वर्षासाठी नेतृत्व करत होते. यापूर्वी, ते ऑनलाइन किराणा प्लॅटफॉर्म ग्रोफर्सवर अडीच वर्षे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) होते. सुमारे दोन वर्षे ते अमेरिकन एक्सप्रेसमध्ये कॉर्पोरेट डेव्हलपमेंटचे संचालक होते. अश्नीर यांनी कोटक बँकेत उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे.

अश्नीर ग्रोव्हरने इंडियागोल्ड, द होल ट्रुथ, ओटीओ कॅपिटल आणि फ्रंट रो सारख्या अनेक भारतीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. अश्नीर ग्रोव्हर एकूण संपत्ती सुमारे ७०० कोटी रुपये आहे. वयाच्या ४० व्या वर्षी अश्नीर हे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीशांपैकी एक आहेत.

3. पियुष बन्सल | कंपनी – लेन्सकार्ट

Lenskart Peyush Bansal Shark Tank Net Work
Peyush Bansal Shark Tank

लेन्सकार्ट चे सीईओ पीयुष बन्सल (४६ वर्ष) हे देशातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक आहेत, त्यांची एकूण संपत्ती ६०० कोटी च्या घरात आहे. ते शार्क टँक इंडियावरील न्यायाधीशांपैकी एक आहेत. शार्क टँक मधील उद्योजकांच्या उद्योगात गुंतवणूककरण्यापूर्वी त्यांनी inFreedo, dailyobjects.com या प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक केली आहे.

पीयूष बन्सल यांनी २०१० मध्ये अमित चौधरी आणि सुमीत कपाही यांच्यासोबत लेन्सकार्ट कंपनीची स्थापना केली. लेन्सकार्टच्या आधी बन्सल यांनी अमेरिकेत टेक दिग्गज मायक्रोसॉफ्टमध्ये काम केले आहे. २००७ मध्ये त्यांनी नोकरी सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला. २०२० मध्ये, लेन्सकार्टने युनिकॉर्न क्लबमध्ये प्रवेश केला असून सध्या कंपनीचे मूल्य $1 बिलियन पेक्षा जास्त आहे.

4. नमिता थापर | कंपनी – Emcure फार्मास्युटिकल्स

Namita Thapar Shark Tank Net Worth
Namita Thapar Shark Tank

आपली मराठी मुलगी पुण्याच्या नमिता थापर या यशस्वी उद्योजकांच्या यादीतील एक मोठ्या स्थानी विराजमान आहेत. त्या शार्क टँक इंडिया या भारतीय रिअॅलिटी शोमधील एक शार्क आहेत. नमिता थापर या एक लोकप्रिय भारतीय महिला व्यावसायिक आहेत ज्या Emcure Pharmaceuticals च्या CEO आहेत आणि २०२१ मध्ये त्यांची एकूण संपत्ती अंदाजे ६०० कोटी इतकी आहे.

नमिता थापर २००१ पासून USA मधील विविध कंपन्यांशी संबंधित आहेत, जसे की GlaxoSmithKline, Guidant Corporation यांसारख्या कंपन्यांमध्ये त्यांनी वित्त आणि विपणनाच्या विविध भूमिकांमध्ये काम केले आहे.

5. अनुपम मित्तल | कंपनी – People Group

Anupam Mittal Shark Tank Net Worth
Anupam Mittal Shark Tank

पीपल ग्रुपचे संस्थापक आणि सीईओ अनुपम मित्तल हे भारताच्या ई-कॉमर्स उद्योगातील सर्वात प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक आहेत. अनुपम मित्तल हे भारतीय व्यावसायिक रिअॅलिटी टीव्ही शो शार्क टँक्स इंडियाचे शार्क (न्यायाधीश) आहेत.

Shaadi.com ची स्थापना अनुपम मित्तल यांनी एका अभिनव संकल्पनेसह केली ज्यामुळे त्यांना मोठे यश मिळाले. अनुपम मित्तल यांनी OLA सारख्या मोठ्या कंपनीमध्ये सुमारे एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, या कंपनीमध्ये त्यांची सुमारे दोन टक्के भागीदारी आहे. अनुपम हे एक सक्रिय गुंतवणूकदार आहेत त्यांनी आधीच ElectricPe, CashBook आणि Lyst सारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. अनुपम मित्तल यांची अंदाजे एकूण संपत्ती १८५ कोटी आहे.

© PuneriSpeaks

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.