महाराष्ट्रात सध्या विधानपरिषद निवडणूक घेण्यात आली. शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी कडून सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते व प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काढून शशिकांत शिंदे व अमोल मिटकरी यांची निवड विधानपरिषद सदस्य म्हणून करण्यात आली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शशिकांत शिंदे यांनी त्यांच्या कार्यकर्ते व हितचिंतक यांना कोरोना पार्श्वभूमीवर उत्साह साजरा न करता त्याच पैशातून गरिबांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनाचे महाराष्ट्रातून कौतुक केले जात आहे. कोरेगाव व सातारा तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी गरिबांना अन्नधान्य वाटप केले.
आमदार शशिकांत शिंदे यांचे आवाहन ,
नमस्कार,
आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या प्रेमाने विधानपरिषदेचा अर्ज दाखल केला आणि बिनविरोध निवड झाली. मला दिलेल्या संधीबद्दल मी सर्व नेत्यांचे आभार मानतो. हे करत असताना मला कल्पना आहे की कोरेगाव, जावळी, सातारा जिल्हा , नवी मुंबई तसेच महाराष्ट्रातील सर्व कानाकोपऱ्यातील कार्यकर्ते व माथाडी कामगारांमध्ये उत्साह आहे. पण जगासह देशात, महाराष्ट्रात आलेल्या कोरोनासारख्या महाभयंकर आजाराची पार्श्वभूमी लक्षात घेता आपण कुठंही बॅनर, फटाके व तशा प्रकारच्या कुठलाही आनंद व्यक्त न करता त्या पैशातून गरीब लोकांना मदत करण्याची भूमिका घ्यावी.
आपण सर्वांनी सोशल मीडिया तसेच फोन व एसएमएस करून दिलेल्या शुभेच्छांचा मी मनापासून स्वीकार करतो. धन्यवाद..
— Shashikant Shinde (@shindespeaks) May 14, 2020आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर कोरेगाव, जावळी, सातारा,नवी मुंबई, पनवेल येथून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे त्यांचा त्यांनी मनापासून स्वीकार केला आहे.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on Telegram. Click here to join our channel and stay updated with the latest Biz news and updates.
अजुन वाचण्यासाठी:
- कोरोना लस: इटली च्या संशोधकांचा कोरोना लस तयार केल्याचा दावा
- पुणे प्रतिबंधित क्षेत्र: पुण्यात काही भागात नियम शिथिल, संपूर्ण यादी
- एसकेएफ कंपनीची ४८ लाखाची फसवणुक, आरोपीस जामीन मंजूर
- गुगलच्या पुण्यातील कार्यालयात बॉम्ब ठेवला आहे …, अशी धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले
- गौतम अदानी आता टॉप 20 मध्येही नाहीत: संपत्ती फेब्रुवारी 2022 मध्ये $ 88 अब्ज होती, सप्टेंबरमध्ये 150, आज $ 61 अब्ज राहिली आहे
- Heart Attack Symptoms in marathi: यामुळे हृदयाच्या नसा होतात ब्लॉक, जाणून घ्या तज्ज्ञांकडून बचावाच्या पद्धती
- बृजभूषण शरण सिंह विरुध्द ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीपटू, काय आहे वाद