स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड वरील वास्तूंची पडझड होत असुन सबंध महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळाला तडे गेले आहेत.
इतकेच नव्हे तर, राजमाता जिजाऊ यांच्या पाचाड येथील समाधीची दुरवस्था झाली असून शिवप्रेमींच्या वारंवार पाठपुराव्यानंतरही केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केला आहे.
किल्ले रायगड दुरवस्था
गेल्या चार वर्षांत रायगड वर कोणत्याही प्रकारची डागडुजी झाली नसून सरकारचे ऐतिहासिक वास्तूंकडे असलेले दुर्लक्ष यातून दिसत आहे, असा संताप शिवप्रेमींनी व्यक्त केला आहे.
६०० कोटी रुपये मंजुर करूनही दुर्लक्ष
केंद्र सरकारने २०१६ रोजी रायगड किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी ६०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली. त्यातील ५० कोटींचा पहिला हप्ता दीड वर्षापूर्वी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा झालेला असून त्यातील एक छदामही अद्याप खर्च केला गेला नाही. रायगड किल्ला रोज थोडा थोडा ढासळतच चालला आहे.
अधिक माहितीसाठी
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले मुख्यमंत्री यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत हे मुख्यमंत्री
PNB Fraud: कसा झाला पंजाब नॅशनल बँक घोटाळा…
Trending Video: इंटरनेटवर धुमाकूळ घालणारी ती मुलगी कोण? तो व्हिडिओ कोणत्या चित्रपटातला?