346 वर्षापूर्वीचे शिवाजी महाराज पत्र, काय लिहिलंय पत्रात?

0
346 वर्षापूर्वीचे शिवाजी महाराज पत्र, काय लिहिलंय पत्रात?
Share

छत्रपती शिवाजी महाराज पत्र सापडणे म्हणजे इतिहासकारांसाठी पर्वणीच, इतिहास संशोधकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील इतिहास पुराव्यानिशी मांडण्यासाठी अशा पत्राचा खूप उपयोग होतो. असेच एक छत्रपती शिवाजी महाराज पत्र हे इतिहास संशोधक घनश्याम डहाणे यांच्या हाती लागले होते.

शिवाजी महाराज पत्र Shivaji Maharaj Old Letter
शिवाजी महाराज पत्र

घनश्याम डहाणे सातार्‍यातील इतिहासाची माहिती गोळा करीत असताना ते कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी स्वामी समर्थ वाग्देवता मंदिराला भेट देण्यास गेले होते. तथापि, ऐतिहासिक दस्तऐवज अभ्यासत असताना त्यांना मराठा शासक छत्रपती शिवाजी भोसले यांनी लिहिलेले 346 वर्षापूर्वीचे एक पत्र सापडले होते.

“मला आठवते की मी या खोलीत गेलो होतो जेथे सर्व कागदपत्रे जतन केली गेली होती. त्या जागेत तापमान खूप जास्त होते. खोली धुळीने व्यापलेली होती आणि मी वेगवेगळ्या कागदपत्रांचा अभ्यास करत होतो, परंतु जेव्हा मी त्या विशिष्ट पत्रावर हात ठेवला तेव्हा मला जाणवले की ते पत्र नक्कीच विशेष आहे

इतिहास संशोधक घनश्याम डहाणे

346 वर्ष जुने असलेले हे पत्र 3 फेब्रुवारी 1674. रोजी लिहिले गेले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पत्र चांगल्या स्थितीमध्ये आहे. कोणालाही पत्राच्या अस्तित्वाची माहिती नव्हती. हे पत्र मोडी लिपीमध्ये लिहिले गेले आहे. अगदी वरच्या बाजूला राजमुद्रा (शाही शिक्का) देखील आहे ज्यामुळे ते छत्रपती शिवाजी महाराज पत्र असल्याचे सिद्ध करते. आजवर शिवाजी महाराजांनी लिहिलेली 273 पत्रे इतिहासकारांना सापडली आहेत आणि त्यापैकी फक्त 103 चांगल्या स्थितीत आहेत. अजून एका पत्राची यात नोंद झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज पत्र मध्ये काय आहे?

हे पत्र सातारा येथील पाली गावचे प्रमुख नागोगी पाटील काळभोर यांना उद्देशून लिहिण्यात आले आहे. काळभोर यांनी पाळीचे तत्कालीन मंत्री असलेल्या खराडी पाटील यांच्याविरूद्ध केलेल्या तक्रारीची दखल घेत शिवाजी महाराजांनी हे पत्र लिहिलेले होते. रायगड किल्ल्यावर झालेल्या शिवराज्याभिषेक आधी 5 महिन्यांपूर्वी हे पत्र लिहिले गेले होते.

पत्रात शिवाजी महाराजांनी काळभोर यांना आश्वासन दिले आहे की त्यांनी यावर चौकशी केली आहे आणि काळभोर यांनी केलेली तक्रार दखलपात्र आहे. ते पुढे म्हणाले की खराडे पाटील यांना ताकीद देण्यात यावी. शिवाजी महाराजांनी असेही लिहिले आहे की काळभोर यांनी याविषयी चिंता करू नये. सुभेदार आबाजी मोरदेव हे खराडे पाटील त्यांच्या वाटेल जाणार नाहीत याची काळजी घेतील.

छत्रपती शिवाजी महाराज पत्राचे पुढे काय होते?

इतर इतिहासकारांकडून पत्र पडताळून पाहण्यात येते आणि पत्राची संपूर्ण पडताळणी झाल्यानंतर ते पत्र शिवाजी महाराज यांच्या पत्रांच्या संग्रहात समाविष्ट केले जाते.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.