इतिहासात हरवलेले शिवाजी महाराज | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

0
इतिहासात हरवलेले शिवाजी महाराज | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

इतिहासात हरवलेले शिवाजी महाराज

सबंध महाराष्ट्रात श्री.श्री.श्री.छ.शिवाजी महाराज यांच्याबद्दल नवा इतिहास शोधण आणि लिहीण हा एक मोठा गुन्हा आहे. पण सध्या होत चाललेल्या शिव-इतिहासाच विकृतीकरण याला आळा कोण घालेल? हा हि एक प्रश्न आहेच. शिवरायांनी अफजल खानाला मारलं , शाहीस्तेखानची बोट कलम केली या व्यतिरिक्त जो आपल्याला महाराजांचा इतिहास माहिती आहे तो ज्याने त्याने आपल्या कु-बुद्धीने रंगवला आणि आपापल्या पुस्तकात लिहिला. लोकांना खरे शिवाजी राजे कळावे म्हणून नाहीतर शिवाजी हा विषय घेऊन स्वताच नाव व्हाव, आयती प्रसिध्दी मिळावी म्हणून हे सारे खटाटोप केले गेले.

मग कुणी लिहील कि सकाळी नाष्ट्याला सोळा भाकऱ्या जेवताना वीस भाकऱ्या रात्रीचा आहार वेगळाच अरे हो. माणूस आहे तो. राजा असला तरी काहीतरी मर्यादा होतीच न त्यांची. काय तर म्हणे पूर्वी हायब्रीड खाद्य नव्हत. पण म्हणून एवढ कोण खात होत का ? का उगाच राजाला जातीच्या राजकारणासाठी देव करायच आणि त्याच्या नावाच्या अंधश्रद्धा पसरवायच्या ?
असही देवाला नाव ठेवतोच आपण. त्याच्या नावान वाईट काम, करतोच आता महाराजांच्या नावाने का अस वागतात हे लेखक हे मला कळत नाही.

सबंध महाराष्ट्रात श्री.श्री.श्री.छ.शिवाजी महाराज यांच्याबद्दल नवा इतिहास शोधण आणि लिहीण हा एक मोठा गुन्हा आहे. पण सध्या होत चाललेल्या शिव-इतिहासाच विकृतीकरण याला आळा कोण घालेल.

इतिहासात हरवलेले शिवाजी महाराज

असो, छ.शिवाजी महाराजांबद्दल काही गोष्टी शोधताना लिहिताना मला एक विचार आला होता किमान एक चार-पाच वर्ष झाली असतील त्याला. शिवाजी महाराज हे दिसायला कसे होते. याचे आठ पुरावे आहेत. इग्रज आणि काही मुसलमानी बखरीमध्ये त्याचा तपशील आहे. कोण लिहितो कि महाराज मध्यम उंचीचे पिवळसर वर्णाचे तरीही देखणे म्हणजे चार चौघात लांबूनच ओळखू येत. कुणी त्यांना बघितल तर पटकन ओळखेल कि हा कुणी साधा असामी नाहीतर कोणतातरी सम्राट अथवा राजा आहे. डोळे काळेभोर पण त्यात एक राजाजी पणाची चमक होती. मिशी अशी जाड नव्हती थोडी विरळच होती पण तिचे कोपरे ताव देवून पिळून धनुष्यबाणासारखे वर उचललेले. दाढी अगदी गालावरून खाली उतरलेली आणि उतरलेल्या त्या दाढीला हनुवटी खाली त्रिकोणी आकारात अशी साचेबंद केलेली. काही मावळ्यापुढे ठेंगणे दिसणारे शिवाजी महाराज बोलताना एकदम कमी पण विचारपूर्वक बोलत. आवाजात त्यांच्या दम नव्हता. सामन्यांसारखा साधारण पण तितकाच गंभीर आवाज त्यांचा होता. उगीचच हसणे, किंवा टोकून बोलणे हे त्यांच्यात गुण नव्हते. ते तितकच बोलत जितक गरजेचे असे. अस त्याचं वर्णन इंग्रजी डायरी,आणि मुसलमानी बखरीत लिहिलेलं आहे.

हे झाल शाब्दिक वर्णन. पण द्रुक वर्णन कस बघायचं ? ब्रिटिशांनी प्रसिध्द केलेल्या एका चित्राला त्यांनी छ.शिवाजी महाराजांचं ते मुळ चित्र असल्याच जाहीर केल.

Shivaji maharaj history
Shivaji Maharaj British Museum Painting

आपल्या सरकारनेही ते मान्य केल. त्याची प्रत बनवून भारतभर त्याची प्रत पोचवली. मागच्या एका लेख मध्ये मी लिहील आहे कि ते चित्र कुठल्याच बाबतीत शिवाजी महाराजांचं वाटत नाही. त्यातले वर्णन आणि इतिहासात केलेलं वर्णन मेळ खात नाही. ते चित्र शिवरायांच न वाटता मला अजूनही छ.संभाजी महाराज यांचच वाटत. तर मग खरे शिवाजी महाराज दिसायचे कसे हा एक कुतूहलाचा विषय आहे. जी महाराजांची चित्र काढली गेली, त्यांच्या हयातीत आणि शिवराज्याभिषेकाला इंग्रज अधिकाऱ्याने जे चित्र काढल ते एका बाजूने काढलेले आहे. आणि भारत सरकारने त्या चित्राला मान्यता दिली. पण समोरून काढलेलं एकही चित्र अद्याप सापडल नाही. असेल तर सापडेल पण नसेल तर?

म्हणून मी काही गोष्टींचा शोध घेतला. आणि त्यात मला अस दिसलं कि सहाशे वर्ष जुण जगप्रसिध्द चित्र मोनालिसा. हिच्या चित्रावरून हि बराच वाद सुरु आहे. कि ते चित्र काल्पनिक आहे, ते चित्र म्हणजे स्वतः लिओनार्डो द विन्ची आहेत. किंवा घेरारदिनी इसाबेल या बाळंतीण बाईच ते चित्र आहे. पण मग शोध घेत घेत संशोधकांना एक सापळा सापडला ज्याची डी.एन.ए. टेस्ट केली. आणि त्यावर आत्ता अभ्यास सुरु आहे. विज्ञान आपल्या विचारांच्या पुढ गेल आहे. सुतावरून स्वर्ग गाठतात अस म्हणतात तसच काहीस विज्ञान हे छोट्याश्या गोष्टीवरून डी.एन.ए. मिळवून त्याची जनुकीय संरचना बनवून त्याची त्रिमितीय चित्रात नकाशा आपल्यासमोर आणते. आणि त्यावरून बराच इतिहास, त्याच्या सवयी, त्याचे काही आजार,रोग, सगळ सगळ संशोधाकांसमोर पेश करते. महाराजांच्या बऱ्याचश्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रात,भारतात, आणि जगात विखुरल्या गेल्या आहेत. त्यातल्या एका वस्तूवर जर का महाराजांचा डी.एन.ए. सापडत असेल तर नक्की आपल्या राजांची जी आत्ता आपल्याला तोंडओळख आहे ती पक्की होईल.
मग त्यात महाराजांची शरीरयष्टी, त्यांची असलेली प्रकृती म्हणजे त्यांना कोणते आजार होते का किंवा नव्हते का ? त्यांच्या जनुकीय संरचनेची पायरी मिळेल आणि सर्वात मोठा पडलेला प्रश्न कि राजेंचा मृत्यू कुणामुळे ऐवजी कशामुळे झाला? गुढगेदुखी कि विषबाधा ? या प्रश्नांची उत्तर ठोस नाही पण या प्रश्नांच्या उत्तराकडे थोडीफार जाणारी मिळतील. त्यामुळे इतिहासात हरवलेले शिवाजी महाराज सापडायला मदत होईल.

पण त्यासाठी महाराजंची शत्र-कापड जी काही सापडली सरकारला ती त्यांना सामान्य घरातून मिळाली. त्यात त्या लोकांनी ती भिंतीवर सजवून पेटारीत धूळखात ठेवलेली. त्याची शहानिशा करण्यासाठी न जाने कित्येक खऱ्या आणि भामट्या इतिहासकार आणि संशोधकांनी त्याला हात लावून तपासणी केली. आणि त्यात महाराजांचा डी.एन.ए. हरवला असेल. पण शोधलं तर सापडत या उक्ती प्रमाणे शोधल तर कुठे न कुठे अजून हि असेल महाराजांचा डी.एन.ए. या जगात. तो सापडला तर आपला हा राजा आज तुम्हा आम्हा माणसासारखा बघता येईल. आणि कल्पनेतल्या चित्रा ऐवजी खऱ्या राजाला आपल्याला पुजता येईल. मी सिंधुदुर्ग किल्ल्यावर जेव्हा महाराजांच्या हाताच्या आणि पायाच्या ठस्याचे निरीक्षण केले तेव्हा काहीच नाही सापडल किबहुना त्या हाताच्या ठस्याला मला शोधाव लागल त्या आत चौकटीत. हे आपल दुर्दैव कि आपणच संपवतोय आपल्या राजाच्या उरलेल्या इतिहासाला.

पण बघू मी शोधात आहे महाराजांच्या देखण्या रूपाच्या. मुळात जन्माचा चित्रकार आहे मी आणि म्हणून अस वाटत कि कल्पनेतल्या विचारांना अनुसरून महाराजांचं चित्र रेखाटण्यापेक्षा आता एकच मास्टरपीस बनवावं महाराजांचं जे अस्सल असेल.
महाराज आशीर्वाद असुद्या, इतिहासात हरवलेले शिवाजी महाराज सापडायला आई भवानीचा आशीर्वाद मिळुदे.
तुमचाच

लेखक: Artista Ajinkya Bhosale
संपर्क: 7558356426

©PuneriSpeaks

कोणीही लेख चोरू नये. लेख आवडल्यास नक्की शेअर करा.

दुसऱ्याचा लेख परवानगी शिवाय वापरणाऱ्याला ३ वर्षापर्यंत कैद होऊ शकते.

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

धर्मवीर संभाजी: त्याग हिंदवी स्वराज्यासाठी

संभाजी महाराज आणि पोर्तुगीज लढाई, Sambhaji Maharaj Portuguese War

शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्या घरात

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.