शिवाजी महाराज रांगोळी: गिनीज बुक मध्ये नोंद होणार
शिवजयंतीनिमित्त लातूरमध्ये अडीच एकर जागेवर रांगोळीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे रेखाचित्र साकारण्यात आले आहे. या चित्रासाठी 50 हजार किलो रांगोळीचा उपयोग करण्यात आला आहे. 19 फेब्रुवारीपर्यंत सर्वांना पाहण्यासाठी रांगोळी खुली ठेवण्यात आली आहे.
शिवमहोत्सव समिती आणि अक्का फाऊंडेशन यांच्या पुढाकारातून छत्रपती शिवाजी महाराज रांगोळी साकारण्यात आली. यांच्यासह १०० जणांनी ही रांगोळी 6 दिवसांत साकारली आहे. थ्री डी स्वरूपातील ही रांगोळी असून रंगाच्या अनेक छटा त्यात साकारल्या आहेत. जगातील सर्वात मोठी रांगोळी असुन त्याची गिनीज बुक मध्ये नोंद व्हावी यासाठी नोंदणी केली आहे. या रांगोळीत शिवाजी महाराज यांचे सिंहासनावर विराजमान झालेले छायाचित्र काढण्यात आले आहे. शिवप्रेमीमधून रांगोळीचा खर्च जमा करण्यात आला.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
शिवजयंती च्या तोंडावर राजधानी रायगड वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीला तडे
सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले मुख्यमंत्री यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत हे मुख्यमंत्री
PNB Fraud: कसा झाला पंजाब नॅशनल बँक घोटाळा…
Trending Video: इंटरनेटवर धुमाकूळ घालणारी ती मुलगी कोण? तो व्हिडिओ कोणत्या चित्रपटातला?