सावधान ! शिवाजी नाहीसा होतोय….

0
सावधान !  शिवाजी नाहीसा होतोय….

सावधान ! शिवाजी नाहीसा होतोय

शिर्षक वाचुन जरासं चमकल्यागत होईन,काहींना उगाच छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल राग य़ेईन,पण गेल्या महीन्यात असा काही प्रसंग माझ्यासोबत घडला ज्यामुळे मला वाटलं की खरंच शिवाजी आपल्यातुन नाहीसा होत चाललाय ,की आपणच हऴुहऴु त्याला नाहीसं करत चाललोयत……?

रविवारची सुट्टी होती ,बरेच दिवस कुठं फिरायला गेलो नव्हतो म्हणुन माझे सहकारी मिञ डाँ.जाधव त्यांचा सौ आणि ५ वर्षांची छोटी मुलगी नित्त्या आणि आम्ही दोघे नवरा बायको असा फिरायला जायचा प्लँन बनला. जवऴच ३०कि.मि वर डोंगरांच्या मधोमध एक हनुमानाचे मंदिर आहे तिथं आम्ही सरांच्या ४ व्हीलर मधे निघालो.रस्त्यात नित्त्याने इंग्लिश च्या खुप सा-या पोयम्स म्हणुन दाखविल्या सर आणि मँडम दोघेही तिला प्रोत्साहन देत होते. मला आणि प्रीतीलाही तिचं खुप कौतुक वाटलं…मग काँन्व्हेंट ,तिथला होमवर्क ,तिथल्या मिस,सगऴ्याबद्दल नित्त्याने भरभरुन सांगितलं. डोंगरामधुन वऴणे घेत घेत आम्ही एकदाचे तिथं पोहोचलो.
शिवाजी
दर्शन झाल्यानंतर असंच आजुबाजुच्या टेकड्यांवर फिरत असताना आम्ही एके ठीकाणी पोहोचलो जिथं दरीवजा जागा होती.समोर गडद हिरवी झाडी,मध्येच थंड हवेची येणारी झुऴूक,अचानक समोरुन येणारे ढग आणि आपल्याला हरवुन टाकणारे धुके.डोळे बंद करुन मी तो गारवा अनुभुवत होतो आणि अचानक माझ्या डोऴ्यापुढे तरळु लागला आपला सह्याद्री…आपला पुरंदर,रायगड,प्रतापगड….आपले शिवराय…
भारावलेल्या अवस्थेतच शेजारी उभ्या असलेल्या नित्त्याला विचारलं तुला शिवाजी महाराज माहितेत का गं? तिच्या चेह-यावरचे हावभाव बिलकुल ही न बदलता ती सहज म्हणाली ‘नाही’.
शिवाजी महाराज
मला तर गालात चपराक मारल्यासारखीच झाली.
तेवढ्यात सर म्हणाले ,”मी नव्हतं का सांगितलं बाळा शिवाजी ने कोणत्या खानाला मारलेलं?”
पहिल्यापेक्षा ही अजुन सहजपणे ती म्हणाली , “हो,आमीर खान ला.”
सर,”आमीर खान नाही बाळा,अफजलखान.”
एव्हाना नकळत झालेल्या जोक वर सर्वच हसत होते…मीही त्या हसणा-यांचा गर्दीत होतो पण कऴत नव्हतं हसतोय नेमकं त्या जोकवर की ज्वाज्वल्य इतिहासाच्या झालेल्या दुर्दशेवर….
पाश्चात्य जीवनशैलीचं आंधऴ्याप्रमाणे अनुकरण करता करता आम्ही आमच्याच जीवनमुल्यांपासुन कधी भरकटलोत तेच समजलं नाही.चकचकीत वाटणा-याला सोनं समजत चाललो आणि जे देदीप्यमान,तेजपुंज आहे ते विसरत चाललो…

आज शिवाजी च वादग्रस्त बनलाय कधी त्याचा जन्मतिथीमुळे, कधी जेम्स लेन प्रकरणामुळे तर कधी अरबी समुद्रातल्या स्मारकामुळे.
लहाणपणी आजीच्या शेजारी आम्ही सर्व भावंडं गोष्ट एेकण्यासाठी झोपायचो…मग आजी सांगायची जिजाऊचा बाल शिवबा, आईचा आदर करणारा, स्वराज्याचा निर्धार करणारा, अन्याय आणि दुष्टांचा संहार करणारा शिवाजी राजा, स्ञीयांचा आदर करणारा शिवबा… लहानाचा मोठा होत असताना रक्तामध्ये हळुहळु भिनायला लागलेला शिवाजी राजा.. मग जसजशी समज वाढत गेली वय वाढत गेली तसतसं पुस्तक, टीव्ही,
कादंब-या ,वर्तमानपञ जिथं जिथं सापडत शिवाजी पडत गेला तिथं तिथं वाचत गेलो, शिवबा समजुन घेत गेलो..नकळत डोक्यातला आणि ओठांवरचं शिवबा हे नाव बदलुन छञपती शिवाजी महाराज कधी झालं तेच समजलं नाही.

होय छत्रपती शिवाजी महाराज!… लहानांपासुन ते व्रुद्धांपर्यंत आपल्या आदर्श जगण्याने सर्वांसाठी ‘दीपस्तंभ’ बनलेले अवलिया म्हणजे महाराज…. जगावं कसं,मुल्य जपावीत कशी हे शिकवणारा ‘आद्यशिक्षक’ म्हणजे महाराज…. स्वाभिमान आणि शौर्याचा ‘मुर्तिमंत पुतऴा’ म्हणजे महाराज….. रांझ्याच्या पाटलाचे हात तोडुन आणि कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आई संबोधुन सोडुन देऊन अखंड स्ञीजातीला बहीण आणि मातेसमान मानण्याचा आदर्श घालुन देणारा ‘चारिञ्यवान’ राजा म्हणजे शिवाजी महाराज,… आभाळ कोसळलं तरी डगमगुन न जाता धैर्याने उभं राहायला शिकवणारा ‘ऊर्जास्ञोत’ म्हणजे महाराज….रणांगनावरचं शञुत्व रणांगनावरंच सोडुन कुराणची प्रत मुस्लिम सैन्यांकडे देणारा ‘मानवतावादी’ सम्राट म्हणजे महाराज….प्रजेच्या गवताच्या काडीलाही हात लावाल तर याद राखा असं आपल्या सैन्याला निक्षुन सांगणारा आणि प्रजेवर जीव ओवाळुन टाकणारा राजा म्हणजे महाराज…पण दुर्दैवाने आपल्यातुन हरवत चाललेत महाराज….

जगण्याचा प्रत्येक पैलु हा महाराजांचा अभ्यास आणि आवड निर्माण केली तर पुढच्या पिढ्यांना आत्मसात होईन. पण नाही आम्हाला फक्त आंधळेपणाने पाश्चात्य जीवन, शिक्षण स्विकारायचंय . ज्यात माणुस म्हणुन जगण्यासाठी लागणारी तत्व कुठंच नाहीत आहे ती फक्त स्वार्थ, चंगऴवादाची रेलचेल. ब-याचदा आपण फक्त अनुकरण करतोय हेच आपल्याला समजत नाही आणि म्हणुनच आपली पिढी सशक्त बनत नाहीय.
छोट्या छोट्या कारणावरुन आत्महत्येमुळं कितीतरी कोवळी मुल्ं मरतायत, व्यसनाधीनतेचं वय हऴुहळु १४-१५ वर्षापर्यंत येतंय, बलात्कार आणि अत्याचार करणा-यांत अल्पवयीन गुन्हेगार वाढतायत… का होतंय हे सगळं? केला कधी मुळाशी जाऊन विचार? करा कधीतरी विचार मग समजेन हे सगळं घडतंय ते शिवाजी आमच्यातुन नाहीसा होत असल्यामुळे…. कारण शिवाजी ही व्यक्ती नसुन ती एक जीवनपद्धती आहे ज्यातुन संस्कार आणि मुल्य जपण्याची शिकवण मिळते…

पण य़ा मिथ्या पाश्चातिकरणामुळे आपण या जीवनपद्धतीलाच तिलांजली दिलीय ….शरम वाटायला हवी…

जाँनी जाँनी एस पप्पा म्हणना-या 3-4 वर्षांचा लेकराचं आपल्याला खुप कौतुक वाटतं पण ज्या वयात व्यक्तीमत्वाची जडणघडण होण्यासाठी शिवरायांसारखी व्यक्तिमत्व त्याचा मनात रुजवली पाहीजेत त्या काळात हा काल्पनिक जाँनी,काल्पनिक पप्पा आणि काल्पनिक शुगर आपण त्यांचा मनात घोळत ठेवतो….ज्या वयात मन आणि मनगट बऴकट होण्यासाठी शिवरायांचे किल्ले आणि शिवरायांच चरिञ त्यांचा हातात पडायला पाहीजे त्याकाळात व्हीडीओ गेम्स, कार्टुन रिमोट आणि मोबाईल त्यांचा हातात देतोयत… आणि आपणंच हळु हळु शिवाजी नाहीसा करतोयत…
पण हे थांबलं पाहीजे, येणारा काळ हा संघर्षाचा असणार आहे, स्पर्धेचा असणार आहे.. सायन्स इतकं पुढं जाईन की अन्नधान्य आणि सुखसोईंची रेलचेल असेन… पण सायन्स कितीही पुढं गेलं तरी मानवी मुल्य ही पिकवता येणार नाहीत किंवा त्यासाठी कोणती मशीन बनवता येणार नाहीत…त्यासाठी आपल्याला इतिहास आणि शिवबा य़ेणा-या पिढ्यांमध्ये रुजवावा लागेन… कारण जे लोक इतिहास विसरतात ते कधीच इतिहास बनवु शकत नाहीत…

सरतेशेवटी एकच आवाहन माँडर्न बना, नवे तंञ, नवी जीवनपद्धती अवगत करा, जगाच्या स्पर्धेत टीकण्यासाठी संघर्षही करा पण हे सर्व करत असताना छञपती शिवाजी महाराज यांसारखा जो तेजस्वी वारसा आपल्याला लाभलाय तो तुम्ही विसरु नका आणि पुढच्या पिढ्यांनाही विसरु देऊ नका… हात जोडुन सांगतो.. शिवाजी नाहीसा होऊ देऊ नका……..

लेखक: डॉ. विशाल शेटे

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचा:

संभाजी महाराज माहिती, छत्रपती संभाजी महाराज इतिहास, पराक्रम, राज्याभिषेक, मराठा साम्राज्य, संभाजी राजे महाराज विशेष

कारगिल युद्ध माहिती, कारगिल युद्ध मराठी, कारगिल युद्धाचा इतिहास, कसे झाले कारगिल युद्ध?

बाप शेतामध्ये उन्हात राबतोय, पोरगा फेसबुक, व्हॉटसअप वर जाळ धूर करतोय

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.