सर्वाना भाऊबीजेच्या कोटी कोटी शुभेच्छा…..!!
शिवरायांना सख्खी बहिण नव्हती
पण स्वराज्यातील प्रत्येक परस्ञी शिवाजी राजाला आपला भाऊ मानत होती .
आणि तुम्हाला सांगायची गरज नाही .
एकवेळ स्ञीया मुलाच ऐकत नाहीत …
नवर्याच ऐकत नाहीत ….
पण भावाच मात्र ऐकतात……………………
शञूच्या बाईसाठी..
शिवाजी राजाच्या मुखातून शब्द बाहेर पडले.
ताई………….
ताई … कोण म्हटले मी तुम्हाला मारणार … या बाळाला मारणार … मी तुम्हाला ताई म्हटले म्हणजे हे बाळ माझा भाचा झाला.
आज पहिल्यांदा मी माझ्या भाच्याला भेटतोय… काही तरी दिले पाहिजे ना…
ताई या बाळाच्या दुधभातासाठी मी ही जिंकलेली गढी त्याला देतोय… आणि आजूबाजूचा प्रदेश तुला चोळी बांगडी साठी..
अस म्हणून राजांनी ते बाळ आईच्या हातात दिले. सन्मानाने तीला गादीवर बसवले . तीचा सन्मान केला. काय होतय हे तीला कळत नव्हते .
पण मगाशी दुःखाने येणारे आश्रू आता आनंदाने वहायला लागले.
राजा.. मी तुला शञू समजले..
मी वैरी समजले..
पण तुच भावा बहिणीच नात निर्माण करून या अबलेचा सन्मान केला…
धन्य शिवाजी राजा..
धन्य त्याचे माता पिता………………………….. .. काय नात आहे हे भाऊ बहिणीचे…
आणि काय नात आहे शिवाजी राजाच.
माझा शिवाजी भाऊ बहिणीच प्रेम शिकवून गेला .
किती बर होईल हे शिवाजी आपल्याला कळले तर…
वादाच्या पलिकडले शिवाजी …
बहिणीचा भाऊ शिवाजी …
माझ्या भावांनो प्रत्येक शिवभक्ताला हे शिवाजी कळले तर …
कोणत्याही स्ञीवर अत्याचार होणार नाही .
निर्भया सारखी प्रकरणे होणार नाहीत .
कारण प्रत्येक मुलीच्या रक्षणासाठी तीचा शिवभक्त भाऊ उभा असेल .
मध्यरात्री कामावरून सुटणारी तरूणी बिनधास्त असेल
कारण तिला विश्वास असेल
हा शिवबाचा महाराष्ट्र आहे.
शिवभक्तांचा महाराष्ट्र आहे.
माझ्या भावांचा महाराष्ट्र आहे….
|| जय भवानी, जय शिवाजी….||⛳?☀