पिंपरीत प्रियकराने ‘Shivde, I Am Sorry’ चे ३०० फलक लावले, कोण आहे शिवडे?

0
पिंपरीत प्रियकराने ‘Shivde, I Am Sorry’ चे ३०० फलक लावले, कोण आहे शिवडे?

Shivde, I Am Sorry

पिंपरीतील पिंपळे सौदागर भागात एकाने प्रेम प्रकरणाकून ”Shivde, I Am Sorry” असे 300 फलक लावल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले होते .

पोलिसांच्या माहितीनुसार प्रेम प्रकरणातून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.
पिंपरीत प्रियकराने ‘Shivde, I Am Sorry’ चे ३०० फलक लावले, कोण आहे शिवडी?

आजपर्यंत आपण रस्त्यावर नेत्यांच्या वाढदिवसाचे, पक्षाच्या कार्यक्रमाचे, लग्नाच्या वाढदिवसाचे ते अगदी घरातील पाळीव प्राण्याला शुभेच्छा देणारे फलक पाहिले असतील. पण पिंपरी मधील पिंपळे सौदागर येथील एका प्रेमाने चक्क प्रेम प्रकरणातून ‘Shivde, I am sorry’ असे 300 फलक लावून बॅनरबाजी केल्याने सध्या त्यांच्या बॅनर चा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

पिंपरीत प्रियकराने ‘Shivde, I Am Sorry’ चे ३०० फलक लावले, कोण आहे शिवडी?
शिवार चौकात ‘Shivde, I am sorry’ असे फलक लागले आहेत. निलेश खेडेकर असे या प्रियकराचे नाव असून त्याच्या मित्र आदित्य शिंदेने ‘Shivde I am sorry’ नावाचे फलक लावायला मदत केली होती. २५ वर्षीय निलेश खेडेकर हा एका उच्चभ्रू व्यापारी कुटुंबाचा सदस्य असून तो मुंबईत MBA करत आहे. त्याने त्याचा प्रेयसीची मनधरणी करण्यासाठी आणि माफी मागण्यासाठी हे सर्व केलं. कारण काही दिवसांपूर्वी त्याचा प्रेयसी सोबत झालेल्या त्याच्या वादामुळे त्यांचे नाते तुटलं होतं.

आदित्यने छोटे आणि मोठे असे ३०० फलक लावल्याचे पोलिसांना सांगितलं आहे. याचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत. घडले असे की त्याची प्रेयसी मुंबईहून पुण्याला येणार होती त्यामुळे त्याने रस्त्यावर हे फलक लावले होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्या विरोधात शनिवारी तक्रार दाखल केली आहे. या कामात खेडेकरला मदत करणाऱ्या त्याच्या मित्राला केशव नगर येथून अटक करण्यात आली आहे.

निलेश खेडेकर चा माफीनामा

हे संपूर्ण प्रकरण त्याच्यावर उलटल्यानंतर खेडेकर खेद व्यक्त करताना म्हटला कि मला एक कलात्मक पद्धतीने तिची माफी मागायची होती. पण आता मला माझी चूक लक्षात आली आहे. माझ्या या कृत्यामुळे माझी , माझ्या प्रेयसीची आणि तिच्या परिवाराची मोठी बदनामी झाली आहे.

हे फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून बॅनरचे छायाचित्रही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हे बॅनर कोणी लावले, ही ‘शिवडे’ कोण आहे, यावर चर्चा रंगू लागल्या होत्या. तुम्हाला या प्रेमविराचा स्टंट कसा वाटला?

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

पुण्यातील इंजिनिअर तरुणाचे ‘कडक स्पेशल’ चहा दालन प्रसिद्धीच्या शिखरावर

Mumbai vs Pune Memes: Mumbai Pune Jokes all in one Combo Pack, Who is the Best? Pune or Mumbai

The Famous Tea Seller Yewle Tea House from Pune City Earns 12 lakh per Month

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.