गुजरात: हिंदुत्वाचा मुद्दा उचलत नेहमीप्रमाणे शिवसेनेने गुजरात निवडणुकीत उडी घेतली. राज्यात आणि केंद्रात सत्तेत भागीदारी असूनही शिवसेना नेहमी विरोधकाची भूमिका बजावताना दिसते, त्याला काही कारण सुद्धा आहेत आणि म्हणूनच सेनेनं गुजरातमध्ये १८२ पैकी ४२ मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले होते. परंतु शिवसेनेच्या ४२ ही उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झाले असून त्यांच्यावर नामुष्कीची वेळ ओढवली गेली आहे.
गुजरात निवडणुकीत शिवसेनेला फक्तं ३३ हजार नऊशे नऊ मतं पडलीत असुन त्यापैकी फक्तं ११ उमेदवारांनाच हजार मतांचा टप्पा ओलांडता आला आहे. बाकीच्या सर्व नावापूरतीच मते मिळाली आहेत. लिंबायत मतदार संघातील शिवसेना उमेदवार सम्राट पाटील यांनी सर्वाधिक ४ हजार ७५ मतं पडली आहेत.
यावर
'आता शिवसेनेला डिपॉझिट वाचवण्यासाठीचं मशिन वापराव लागणार'
असा टोमणा मुंबईच्या भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी काल विजयी जल्लोष करत लगावला. तर शिवसेनेनं निवडणुकीत जय-पराजय होतच असतात. आम्ही गुजरातमध्ये पुढच्या निवडणुकीतही लढणार, असे शिवसेनेचे संजय राऊत म्हणाले.