मराठीत बोलण्याची मागणी केल्याने सराफाने अपमानास्पद वागणूक देत सोने विकण्यास मनाई करत पोलिसांच्या मदतीने दुकानाबाहेर काढलेल्या लेखिका शोभा देशपांडे यांच्या ठिय्या आंदोलनाला यश आलेले आहे.

तब्बल २० तास दुकानासमोर ठिय्या मांडलेल्या शोभा देशपांडे यांची सराफाने क्षमा मागितली आहे. “माझा जन्म मुंबईचाच, मला क्षमा करा” अशा शब्दात सराफने क्षमा मागितली. काल दुपारपासून ठिय्या देऊन बसलेल्या शोभा यांनी आपल्या जिद्दीने सराफाला झुकवले आहे.
मनसे चे संदीप देशपांडे यांनी या प्रकरणात आता उडी घेतली आणि चित्र पालटले. ज्यांना मराठी बोलायची लाज वाटत असेल त्यांना आमच्या स्टाईलने शिकवणी देऊ, असा इशाराच संदीप देशपांडे यांनी दिल्यानंतर सराफने सकाळी येऊन शोभा देशपांडे यांची क्षमा मागितली.
गुरुवारी दुपारपासून शोभा देशपांडे यांनी दुकानासमोरील फूटपाथवरच ठिय्या मांडला होता. याची माहिती मिळताच संदीप देशपांडे यांनी त्याठिकाणी पोहचून या आंदोलनाचा छडा लावला.
नक्की काय घडले होते
शोभा रजनीकांत देशपांडे या गुरुवारी दुपारी त्या कुलाबा भागातील ससून डॉक परिसरातील महावीर ज्वेलर्स मध्ये कानातील रिंग खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. दुकानदार हिंदीत संवाद साधत असल्याने त्यांनी मराठीत बोलावे अशी विनंती केली. दुकानदाराने गुर्मी दाखवत मराठीत बोलण्यास नकार दिला. आवडलेल्या रिंग घेण्यास तयार असलेल्या देशपांडे यांनी रिंग विकण्यास नकार दिला. यावर शोभा देशपांडे यांनी नियमाप्रमाणे दुकानाचे लायसन्स मागितले, दुकानदार लायसन्स दाखवायला तयार नसल्याने त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दुकानदाराची बाजू घेत शोभा देशपांडे यांनाच दुकानाबाहेर ढकलून दिले असा आरोप शोभा देशपांडे यांनी केला.
याबाबत पोलिसांची कारवाई संशयास्पद आहे. मराठीसाठी लढणाऱ्या लेखिकेला मदत करण्याऐवजी दुकानदाराबरोबर शोभा देशपांडेंना दुकानाबाहेर काढल्याने पोलिसांच्या कारवाईवर टीका होत आहे.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
PuneriSpeaks is now on Telegram. Click here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.
अजुन वाचण्यासाठी:
- CSK Vs KKR Memes: मॅच हरल्यावर धोनी, केदार जाधव यांच्यावर मिम्स चा पाऊस
- मिर्जापुर 2 ट्रेलर: गुड्डू आणि कालीन भैया यांच्यात रंगणार घमासान