श्रीकांत कर्वे: ५३ बेजबाबदार लाचखोर RTO अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणारे आजोबा

0
श्रीकांत कर्वे: ५३ बेजबाबदार लाचखोर RTO अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणारे आजोबा

RTO मध्ये गेल्यावर मनस्ताप झाला नाही असा व्यक्ती सापडणे दुर्मिळ. एजंट चा सुळसुळाट आणि उर्मट अधिकारी यांची मिलीभगत सामान्य नागरिकांच्या खिशाला चाट लाऊन जाते. “५०० द्या लायसन्स काढून देतो”, “१००० द्या RC काढून देतो” हे ऐकतच RTO मध्ये कसाबसा प्रवेश मिळतो.

आत गेल्यावर अधिकारी एक काम करण्यासाठी पूर्ण दिवस घालवतात. परंतु आपण शेवटी काम झाले म्हणून मनस्ताप दाबत सारे विसरून जातो. परंतु पुण्याच्या कर्वे आजोबा म्हणजेच Shrikant Karve यांनी या अधिकारी आणि दलालांना धडा शिकवण्याचा प्रण केला आहे.
श्रीकांत कर्वे (Shrikant Karve) हे गेली सहा वर्षे RTO च्या कारभाराविरुद्ध लढत आहेत. श्रीकांत कर्वे (Shrikant Karve) गेली सहा वर्षे उच्च न्यायालयात चकरा मारत आहेत. परिवहन विभाग म्हणजेच आरटीओच्या दगडाला टकरा देत आहेत. 70 वय असलेले कर्वे आजोबा या वयातही RTO च्या ढिसाळ कारभाराविरुद्ध लढत आहेत.

श्रीकांत कर्वे यांचा लढा | Shrikant Karve Battle

श्रीकांत कर्वे यांचा लढा सुरु झाला तो एका अपमानामुळे. त्यांना आलेल्या RTO च्या अनुभवामुळे त्यांनी आपल्या अपमानाचा बदल घेण्याचे ठरवले. श्रीकांत कर्वे यांचा ट्रान्सपोर्ट चा व्यवसाय आहे. त्यांनी वाहन वार्षिक तपासणीसाठी पुणे आरटीओ कार्यालयात आणले होते. सकाळी अकरा वाजता आलेले कर्वे आपली वेळ येण्याची वाट पाहत बसले. पासिंग करणारा अधिकारी टेबलावर पाय ठेऊन बसला होता. संपूर्ण दिवस गेला पण कर्वे आजोबांना काही पासिंग दिले नाही. एजंट कडून येणारी कामे करण्यात व्यस्त असलेल्या अधिकाऱ्याने कर्वे यांना दिवसभर बसवून ठेवले. सायंकाळचे सहा वाजले तरी कर्वे यांचे वाहन त्या अधिकाऱ्याने तपासणीस घेतले नाही. शेवटी कंटाळून सहा वाजता कर्वे यांनी याबाबत त्याच्याकडे विचारणा केली, तेव्हा त्या अधिकाऱ्याने पासिंग करण्यासाठी ११०० रूपयांची मागणी केली. त्यावर चिडलेल्या कर्वे यांनी, भीक सकाळीच मागायची होती ना. मला सात तास बसवून आता भीक काय मागतोस? मी देणार नाही, असा कडक पवित्रा घेतला. कर्वे यांनी अधिकाऱ्याला त्याची जागा दाखवून दिल्यानंतर चिडलेल्या अधिकाऱ्याने कर्वे यांनाच दमबाजी करत “माझे कोणी वाकडे करणार नाही” असा तोरा मिरवत सांगितले. पण हा तोरा RTO च्या पथ्यावर पडेल हे त्याला समजले नाही. लाचखोर अधिकाऱ्याने केलेल्या अपमानाबद्द्दल यांनी या अधिकाऱ्याला तुला धडा शिकवेन असा प्रण करत आपला लढा सुरु केला.

कर्वे यांच्या अपमानापोटी सुरू झालेली ही लढाई उच्च न्यायालयात अजूनही सुरू आहे. PMT च्या बस आणि खाजगी वाहने न तपासताच पासिंग केली जातात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे हे कर्वे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दरवर्षी आजारपणामुळे मरणाऱ्यांपेक्षा अपघातात मरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पण याकडे कोणाचे लक्ष नाही. जबाबदार आरटीओ अधिकारी हे बस किंवा इतर परमीटची वाहने न तपासताच पास करतात. बिघडकी वाहने रस्त्यावर अपघाताला निमंत्रण देतात. एक अधिकारी दिवसात जास्तीत जास्त ३५ ते ४० वाहने तपासून पाहू शकतो परंतु हेच अधिकारी एका दिवसात PMT च्या  400 हून अधिक बस तपासल्याची नोंद करतात. सर्व आकडेवारी कर्वे यांनी गोळा करत न्यायालयासमोर मांडली. अनेकदा तर वाहन तपासणीस येतही नसून अधिकारी त्याचे पासिंग करतात. आता हे पासिंग कसे करतात हे सर्वांना माहित आहेच. हे सर्व कर्वे यांनी न्यायालयासमोर मांडले. न्यायालयाला त्यांची बाजू पातळी त्यामुळे न्यायालयाने दोन ज्येष्ठ वकिलांना “अमॅक्‍युस क्‍युरी’ (न्यायालयाचे मित्र) म्हणून नेमले आणि कर्वे यांनी दाखल केलेल्या याचिकेची तथ्यता तपासून पाहण्यासाठी परिवहन विभागाला आदेश देत वाहने पासिंग करण्यासाठी काही विशेष आदेश दिले.

या आदेशानुसार न्यायालयाने वाहन पासिंग ला चित्रीकरण कार्याची अट घातली. पण वाट काढण्यात पटाईत असणारे अधिकाऱ्यांनी यातून सुद्धा पळवाट शोधत कॅमेरे योग्य क्वॉलिटिचे लावले नाहीत. काहींनी तर चक्क स्वतःच्या मोबाईलवर पासिंग चे चित्रण केले. परिवहन निरीक्षकांनी ज्या वाहनांची तपासणी केली त्याच्या किमान दहा टक्के वाहने ही संबंधित निरीक्षकाच्या वरिष्ठांनी तपासल्याचे खोटे अहवाल न्यायालयात सादर केले. त्यामुळे न्यायालयाने आदेश देऊनही काहीच होत नसल्याचे कर्वे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायमूर्ती अभय ओक यावर ताशेरे ओढत परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना तपासणीचे आदेश दिले. मात्र न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले गेले नाही. यावर न्यायालयाने सचिवांवर अटक वॉरंट बजावण्याचा इशारा दिला. तेव्हा सरकारी यंत्रणा गडबडून जागी झाली. न्यायालयाने कामचुकार ५३ अधिकाऱ्याचे निलंबन करण्यास भाग पाडले.

परंतु हि कारवाई म्हणजे धोका असल्याचे निदर्शनास येईल आहे. घरबसून वेतन मिळणार असेल तर पगारी रजा कोणाला आवडणार नाही. कोणाचे निलंबन करायचे यावरून सुद्धा पैशाच्या वाटाघाटी सुरु झाल्या आहेत. यात बळीचा बकरा कनिष्ठ अधिकारी बनत असून वरिष्ठ अधिकारी मात्र मोकळे फिरत आहेत. अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी अशी अपेक्षा कर्वे यांनी केलेली आहे.
“सरकारी काम आणि महिनाभर थांब” याचा अनुभव आलेल्या श्रीकांत कर्वे यांना आमिष देण्याचा प्रयत्न सुद्धा झाला. परंतु अपमानाचा धडा शिकवायला सज्ज झालेले आजोबा याला धजले नाहीत. पैशाच्या बळावर काम होत नाही हे दिसल्यानंतर बळाचा वापर करण्याचा प्रयत्न झाला. त्यांना आरटीओ कार्यालयात धक्काबुक्कीचा प्रयत्न सुद्धा केला गेला. तरीही कर्वे यांनी आपला बाणा सोडलेला नाही. सामान्य माणसाची ताकद काय असते, हे त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दाखवून दिले आहे.

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीही यात लक्ष न घातल्याचे श्रीकांत कर्वे (Shrikant Karve) म्हणाले आहेत. सरकारला वठणीवर आणायचे काम श्रीकांत कर्वे करत आहेत. आपल्याला या लढ्याबद्दल काय वाटते आम्हाला नक्की कळवा.

©PuneriSpeaks

अशाच अनेक अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि  टि्वटर आणि इंस्टाग्राम आम्हाला नक्की फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

सर्वात सुंदर चहा : जागतिक चहा दिन

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ?

दोन गुरू: भूक आणि अपमान Nana Patekar History नाना पाटेकर यांनी लिहिलेला त्यांच्या पुर्वायुष्यातील भावस्पर्शी अनुभव

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.