श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट कडून पूरग्रस्तांना 10 कोटींची मदत जाहीर केली आहे.
कोल्हापूर, सांगली आणि आजूबाजूच्या परिसरात उद्भवलेल्या पूरग्रस्त परिस्थितीमुळे अनेक गावांचे मोठे नुकसान झालेले आहे. लोकांच्या आर्त हाकेनंतर देवस्थानांनी मदतीचा हात पुढे करत मदत सुरु केली आहे.
महाराष्ट्रातील अनेक देवस्थानांकडून पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरूच आहे. यात मागे न राहता श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट देखील त्या भागातील एका गावाची संपूर्ण उभारण्याकरीता करण्याकरीता पुढाकार घेणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ने १० कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. सध्या सुरु असलेली शासनाची मदत व पूरस्थिती निवळल्यानंतर आवश्यकतेनुसार टप्याटप्याने मदत कार्य सुरु केले जाईल अशी माहिती ट्रस्ट ने दिली आहे. गावातील सर्व घरे, मंदिरे, शाळा आणि मशिद देखील ट्रस्टने दिलेल्या निधीतून आवश्यकतेनुसार टप्याटप्याने उभारण्यात येईल अशी योजना आखलेली आहे.
सिद्धिविनायक, साई मंदिर शिर्डी अशा मोठ्या देवस्थानांकडून आधीच मदत मिळालेली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट च्या मदतीनंतर पूरग्रस्तांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
जेव्हा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या स्कूटर ला DSP चा मुलगा ऑडी ने ठोकतो !