Sindhutai Sapkal: अनाथांची माई सिंधुताई सपकाळ माहिती

0
Sindhutai Sapkal: अनाथांची माई सिंधुताई सपकाळ माहिती

अनाथांची माई सिंधुताई सपकाळ माहिती मिळवण्यासाठी खालील लेख आपल्या उपयोगी येईल. Sindhutai Sapkal यांच्याविषयी खास…

जन्म१४ नोव्हेंबर १९४७
मृत्यू४ जानेवारी २०२१, पुणे
राष्ट्रीयत्वभारतीय
टोपणनावेचिंधी
पुरस्कारपद्मश्री (२०२१)
बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार

भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात दुसरा गणला जातो आणि या लोकसंख्येचा एक महत्वपूर्ण भाग म्हणजे मुले आहेत. परंतु या मुलांचा एक भाग सहसा अनाथ किंवा सोडलेला आहे. त्यांना रोज या अनाथ असण्याला तोंड द्यावे लागते सतत अपमान सहन करण्यास भाग पाडले जाते.

Photo credits

Sindhutai Sapkal Information | सिंधुताई सपकाळ माहिती

सिंधुताई सपकाळ Sindhutai Sapkal यांची कथा अशाच अनाथ मुलांची माऊली म्हणून तयार झाली आहे. १४ नोव्हेंबर १९४७ रोजी सिंधुताई सपकाळ यांचा जन्म महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील एका गुरे चरखा कुटुंबात झाला.

सिंधुताई सपकाळ बालपण

अनावश्यक मानले जाते असे ‘चिंधी’ नाव तिला देण्यात आले, याचा अर्थ समाजाकडून फाटलेले कापड होतो. परंतु सिंधुताईंची अधिक शिकण्याची इच्छा सर्वव्यापी होती. तिचे वडील तिच्या शिक्षणासाठी उत्सुक होते, पण त्यांच्या आईने या शिक्षणाला विरोध केला. म्हणूनच 4 थी पर्यंतच तिचे शिक्षण पूर्ण केले, पुढे शिक्षणाची आवड असताना सुद्धा आईच्या विरोधापायी वयाच्या 10 व्या वर्षीच सिंधू म्हणजेच ‘चिंधी’ चे लग्न 30 वर्षांच्या एका माणसाशी लावून दिले.

Photo Credit's

Sindhutai Sapkal प्रवास

बालविवाहाच्या साखळदंडात अडकल्यावरही सिंधूने आशा सोडली नाही. त्याऐवजी असहाय्य आणि अत्याचारग्रस्त उपेक्षितांच्या मदतीसाठी तिच्या उत्कटतेला अजून बळ मिळाले. विवाह झाल्यानंतर वर्धामध्ये नवरांगण जंगलात स्थायिक झाली, 1972 मध्ये तिने वन विभाग आणि जमीनदारांच्या गाईचे शेण गोळा करणाऱ्या गावातील स्त्रियांचे शोषण करणाऱ्यांविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. तिच्या ह्या एका निर्णयामुळे तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाईल याची सिंधुला कल्पना देखील नव्हती. तिच्या गर्भधारणेदरम्यान एका जमीनदाराने तिच्या विवाह बाह्य संबंधाबद्दल एक ओंगळ अफवा पसरवली. यामुळं तिच्या समाजाकडून तिला नकार दिला गेला. तिच्या पतीने तिला घरातून बाहेर काढले. दुःखाची गोष्ट म्हणजे, १४ ऑक्टोबर 1973 रोजी एका गोशाळेत तिने आपली मुलगी ममताला जन्म दिला. सिंधुताई सपकाळ आपल्या माहेरी परतल्या, पण तिथेही त्यांच्या आईकडून तुसड्या नकारांचा सामना करावा लागला. हरवलेल्या आणि विश्वासघाताचा सामना करणाऱ्या सिंधुताईंनी रेल्वेगाडीतून गाणी गायला सुरुवात केली आणि रस्त्यांवर उतरून मागून रोजचे दिवस धकलण्यास सुरुवात केली. तिने स्वत: आणि तिच्या मुलीच्या अस्तित्वासाठी संघर्ष चालू ठेवला आणि रेल्वे स्थानके, गोठा आणि स्मशानभूमीचे तिने घर केले.
टिकून राहण्यासाठी सतत संघर्ष करताना, ती महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यात स्थित चिकलदरा येथे स्वतःला घेऊन आली. येथे, वाघांच्या संरक्षणार्थ प्रकल्पामुळे 84 आदिवासी गावे हद्दपार करण्यात आली होती. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर एक प्रकल्प अधिकाऱ्याने आदिवासी गावकऱ्यांतील 132 गायी जप्त केले आणि तेव्हा त्यातील एका गायीचा मृत्यू झाला. सिंधुताईंनी असहाय्य आदिवासी गावकर्यांची योग्य पुनर्वसनासाठी लढा देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रयत्नांना वनाधिकार्यांनी स्वीकारले आणि त्यांनी पर्यायी पुनर्स्थापनेसाठी आदिवाश्यांची योग्य व्यवस्था केली.

सिंधूताई सपकाळ अनाथ आश्रम सुरुवात

ह्या अनुभवातून सिंधुताईना असहाय्य, अनाथ व उदासीनपणे दुर्लक्ष केलेय स्त्रियांच्याकडे लक्ष गेले. दारिद्र्य, अपमान आणि बेघर होण्याऱ्या अनुभवांच्या फेऱ्यातून स्वतः त्या गेल्या असल्याने त्यांना त्यातील आक्रोश दिसून आला. सिंधुताईंनी या अनाथ मुलांना अंगीकारणे सुरू केले आणि काहीवेळा त्यांना पोसण्यासाठी घरोघरी अन्न मागत फिरल्या. आपल्या मुलीला सांभाळताना अनाथ मुलांच्या संगोपनात पक्षपातपणा टाळण्यासाठी सिंधुताईंनी पुण्यातील एका ट्रस्टकडे आपल्या मुलीला पाठविले. अनेक वर्षाच्या कठोर परिश्रमानंतर त्यांनी आपले पहिले आश्रम चिखलदरा येथे उभे केले.

Photo credit's

त्यांनी आश्रमांसाठी पैसे उभारण्यासाठी गावातील व शहरी भागातून प्रवास केला. निधीच्या अभावामुळे त्यांना बर्याच वेळेस पुढच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागला. पण सिंधुताई कधीही थांबल्या नाहीत. आजपर्यंत, त्यांनी 1200 हुन अधिक अनाथ मुलांचे संगोपन केले आणि त्यांना प्रोत्साहन दिले आहे. सर्वजण त्यांना ‘माई’ या नावाने ओळखतात. त्यांच्या अनेक दत्तक मुलांमध्ये आता वकील आणि डॉक्टर आहेत. आता सिधुताईंची मुलगी आणि दत्तक घेतलेली मुले स्वतः अनाथाश्रम चालवत आहेत.

Photo Credit's
Aamir khan with Sindhutai Sapkal

विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून सिंधुताई सपकाळ यांना सुमारे 270 पुरस्कार मिळाले आहेत. 2010 मध्ये ‘मी सिंधुताई सपकाळ’ या मराठी चित्रपटाची बायोपिक म्हणून रिलीज केली गेली. तिने महाराष्ट्रात अनेक संस्थांची स्थापना केली जे हजारो अनाथ मुलांना शिक्षण आणि आश्रय देत आहेत. आजही, 69 वर्षांच्या वयाच्या सिंधुताई सपकाळ Sindhutai Sapkal या अनाथ मुलांचे भविष्य घडवण्यासाठी अविरतपणे काम करतात कारण त्यांचा असा विश्वास आहे की वंचित मुलांचा अर्थ एक वंचित राष्ट्र आहे.
सिंधुताई यांना भारत सरकारने २०२१ ला पद्मश्री देऊन सन्मानित केले
सिंधुताईंची महती सर्वांना समजेल यासाठी शेअर करा…

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

महाराष्ट्र संस्कृती: महाराष्ट्राचा प्राचीन उल्लेख

मधु चंद्र: कमी वयातले बालपण

शिवाजी महाराज बलात्काराच्या गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा द्यायचे? चौरंग शिक्षा म्हणजे काय?

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.